Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडअमोघ कुळकर्णी व भिसेगाव ग्रामस्थांचे आमरण उपोषण तूर्तास स्थगित..

अमोघ कुळकर्णी व भिसेगाव ग्रामस्थांचे आमरण उपोषण तूर्तास स्थगित..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेली ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेला कर्जत – भिसेगाव या भुयारी मार्गाच्या निधीसाठी व भिसेगाव चार फाटा रस्त्याचे काम ” मरगळ ” आल्यासारखे होत असल्याने प्रतीक्षेत असलेल्या लोकार्पण सोहळ्यासाठी संपूर्ण काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी तर साई – गजानन नगर येथील गटारे बंदिस्त करण्यासाठी माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुलकर्णी व भिसेगाव ग्रामस्थांनी पुकारलेले २६ जानेवारी २०२४ रोजी आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केले असल्याचे पत्र देऊन ज्यूस देऊन उपोषण सोडविले. त्यामुळे तूर्तास हे उपोषण स्थगित केले असून जर मागण्यांची पूर्तता लवकर न झाल्यास पुन्हा ” उपोषणाचे हत्यार ” उपसणार असल्याचे मत अमोघ कुलकर्णी यांनी व्यक्त केले. या उपोषणास भिसेगाव ग्रामस्थांचा पूर्ण पाठींबा होता यावेळी त्यांच्या समवेत ज्योती कुळकर्णी , जगदीश दिसले, अनंता जूनघरे, प्रकाश हजारे , गणेश गोसावी , नागेश भरकले , कडू , साजना भुजबळ , सतीश जाधव , दिलीप भुजबळ , दिनेश भरकले , वैभव पवार , रमेश देशमुख , अनिता जुनघरे , स्मिता ओरंगाबादकर, समीक्षा आंबवणे , सुप्रिया देशमुख , कोमल बडेकर, विष्रुता हजारे , गौरी हजारे , हजारे मामी , मयुरा जोगळेकर आदींनी तसेच अनेक ग्रामस्थांनी पाठींबा दर्शविला होता.

कर्जत – भिसेगाव या जोड रेल्वे भुयारी मार्गासाठी १५ दिवसांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी निधी देण्याबाबत चर्चा करून निधी उपलब्ध करून लवकरच हे काम सुरू होईल , तर चारफाटा ते बिकानेर रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण करण्याबाबत तसेच भिसेगाव येथील साई गजानन नगर येथील गटारे बंदिस्त करून देण्यासाठी कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी गारवे यांना संपर्क करून लवकरच काम पूर्ण करू , असे पत्र आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी उपोषण कर्त्यांना दिल्याने हे उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले.

या उपोषणास अनेक राजकीय – सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांनी भेटी देवून पाठींबा दर्शविला होता . यावेळी माजी आमदार भाजपचे सुरेश भाऊ लाड , उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे , जिल्हा महासचिव दीपक बेहेरे , नगरसेविका पुष्पा दगडे , सुवर्णा निलधे , भारती पालकर , मधुरा चंदन , सोमनाथ ठोंबरे , उमेश गायकवाड , संकेत भासे , माजी नगरसेवक बाळाजी विचारे , माजी नगराध्यक्ष राजेश लाड , मोहन ओसवाल , मनसेचे भारती कांबळे, सायली शहासने, त्याचप्रमाणे अनेक पत्रकारांनी उपस्थिती दर्शविली.

उपोषण सोडते प्रसंगी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , नगरसेवक संकेत भासे, उमेश गायकवाड , सोमनाथ ठोंबरे , पुष्पा दगडे , माजी नगरसेवक बाळाजी विचारे , माजी पंचायत समिती सदस्य पुंडलिक भोईर , हेमंत देशमुख , विजय हरिश्चंद्र , सुनील गोगटे, भिसेगाव पोलीस पाटील संजय हजारे , सरपंच तथा युवा सेना रायगड जिल्हा प्रमुख जयेंद्र देशमुख , युवा सेना जिल्हा महासचिव संदीप भोईर त्याचप्रमाणे अनेक कर्जतकर यावेळी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page