(कर्जत:अष्टदिशा वृत्तसेवा ) कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीत आसल गावासाठी असलेल्या स्मशाभूमीवरील पत्रे तुटून दुरावस्था झाल्याने येथील ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करत असून लवकरात लवकर स्मशानभूमीची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थ वर्ग करीत आहेत. ग्रामस्थांकडून वारंवार तक्रार करूनही स्थानिक लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष का?असा प्रश्न येथे उपस्थित केला जात आहे.तर ह्या स्मशानभूमीची दुरुस्ती कधी होणार ह्याकडे सर्व आसलकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
आसल परिसरातील एखादी दुःखद घटना घडल्यास अंत्यविधी दरम्यान स्मशाभूमीवरील पत्रे तुटले असल्याने पावसाळ्यात पावसा पासून बचाव करावा लागतो,तर उन्हाळ्यात भर उन्हा मध्ये नागरिकांना थांबून अंत्यविधी करावी लागत आहे.येथील ग्रामस्थांनी आपली व्यथा संबंधित प्रशासनाला मांडूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रशासनविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.यावेळी स्मशाभूमीवरील पत्रे बसवून दुरुस्ती करावी आणि विद्युत लाईटचीही सोय याठिकाणी करण्यात यावी जेणेकरून अंत्यविधी करण्याकरिता ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागणार नाही.