if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )प्रत्येक घटनेचा एक इतिहास असतो . बाहेर घडलेला जातीय दंगलीचा इतिहास आपल्या परिसरात – शहरात घडू नये , म्हणूनच याची काळजी घेत सर्व समाज एकोप्याने राहिला पाहिजे , सर्वधर्म समभावाची वागणूक सर्वांना मिळाली पाहिजे हा ध्येय उराशी बाळगून ” हिंदू – मुस्लिम ” समाज भाई – भाई , हि संकल्पना घेवून ९० च्या दशकात मुंबईत जातीय दंगल घडत असताना माझ्या खाटीक आळी परिसरात व कर्जतमध्ये ते कदापी होवू नये म्हणून मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या अनेक सांस्कृतिक , शैक्षणिक , सामाज़िक , धार्मिक , राजकीय व भावनिक संबंध जोपासणाऱ्या अशा विविध चळवळीचे पैलू आपल्या कार्यातून हिंदू – मुस्लिम समाजाला दाखवून एकता – बंधुता व एकमेकांत प्रेम निर्माण होण्यासाठी ” सर्वांच्याच जीवा भावाचे व प्रेरणास्थान ” असलेले अनंत काका जोशी यांच्या प्रेरणेने स्वर्गीय संदीप करेकर , विकास खांगटे , पत्रकार सुनील दादा दांडेकर यांनी तसेच युसुफ खान , विनायक गुरव , पांडुरंग चौधरी , हरि गुरव , महेश निघोजकर , शैलेश कांबळे , संतोष गुरव , शैलेश सातपुते , अभिनय खांगटे , मोहम्मद सय्यद , किशोर शेलार , अमीन कोतवाल , सुधाकर शेलार , नितीन कुलकर्णी , गजानन गुरव , विजय करेकर , राजेंद्र कांबळे , अरुण विशे , चांद मुजावर , या सर्वांच्या सहकार्यातून राजकारण विरहित अशा ” साई मित्र मंडळाची ” स्थापना सन १९९३ साली करून सन १९९५ पासून सार्वजनिक माघी गणेशोत्सव कर्जत नगर परिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारी असणाऱ्या साई नगर परिसरात सर्वधर्मसमभाव व हिंदू – मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला माघी गणेशोत्सव यावर्षी २९ व्या वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत.
सलग २० वर्षे शिवभक्त नदीम भाई युसुफ खान हे या साई मित्र मंडळाचे अध्यक्ष असून सर्व धर्म समभावाची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून ” शिवभक्त साबीरभाई शेख ” यांचा वारसा मंडळाचे अध्यक्ष नदीम भाई खान पुढे चालवीत आहेत . पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात भजन किर्तन , व्याख्यान , श्री सत्यनारायण महापूजा , हळदी कुंकू , विविध स्पर्धा , सांस्कृतिक कार्यक्रम , मतदान नोंदणी व आभा कार्ड शिबिर होणार असून यांत सर्वांनी उपस्थिती दर्शवावी , असे आवाहन अध्यक्ष नदीम भाई खान यांनी केले आहे.
साई मित्र मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत अध्यक्ष नदीम भाई खान , उपाध्यक्ष योगेश राठी , खजिनदार केदार गुरव यांनी मंडळाचे सदस्य व श्रद्धाळू भाविकांच्या सहाय्याने अनेक सामाजिक उपक्रम , शिबिरे , रक्तदान शिबिर , आरोग्य शिबिर ,आरोग्यसेवा , डोळ्यांचे शिबिर , आधार कार्ड , पँन कार्ड शिबिर , महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम , विविध स्पर्धा , मतदान नोंदणी , आभा कार्ड शिबिर , कोरोना काळात गरीब – गरजू नागरिकांना मदत , गणेशोत्सवात भव्य संदेश देखावे सादर करून समाजात एकोपा रहाण्यासाठी सदैव प्रयत्न करतात .म्हणूनच या मंडळात सर्व जाती धर्माचे सदस्य आहेत. यापूर्वी देखील मंडळाचे अध्यक्ष नदीम भाई खान यांनी मुंबईमध्ये ताज हॉटेल , सी.एस.टी.रेल्वे स्टेशन येथे घडलेल्या दहशतवादी भ्याड हल्याचा देखावा प्रदर्शित केला होता .यांत त्यांनी बाहेरील शत्रु बरोबरच आज देशात धार्मिक तेढ निर्माण करून एकमेकांशी लढायला लावणाऱ्या जातीयवादी शत्रूंपासून सावध रहाण्याचा तसेच सामाजिक व धार्मिक एकता निर्माण होण्याची गरज असल्याचे संदेश देखाव्यातून दाखवून समाजात सर्व धर्म समभावाचा संदेश दिला होता , म्हणूनच अयोध्येत होणाऱ्या ” श्री राम लल्ला ” च्या मूर्ती प्रतिष्ठापना दिनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी कर्जतमध्ये झालेल्या कार्यक्रमात आरतीचा मान शिवभक्त नदीम भाई खान यांना दिला होता.
साई मित्र मंडळ सार्वजनिक माघी गणेशोत्सवाचे अध्यक्ष – नदीम युसूफ खान , उपाध्यक्ष – योगेश राठी , सचिव – शुभम कुलकर्णी , सहसचिव – सौरभ करेकर , खजिनदार – केदार गुरव , सहखजिनदार – वैभव खांगटे , कार्याध्यक्ष – सज्जाद सय्यद , सहकार्याध्यक्ष – अक्षय कुलकर्णी , त्याचप्रमाणे असंख्य सभासद या पाच दिवसाच्या गणेशोत्सवात मेहनत घेऊन काम करत असतात . शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ रोजी श्रींची भव्य ढोल ताशांच्या गजरात व भजन – किर्तनात मिरवणूक काढून विसर्जन होणार आहे. दरवर्षी या माघी गणेशोत्सवाचे तमाम कर्जतकर नागरीक , मान्यवर व महिला वर्ग दर्शन घेऊन मोठ्या संख्येने उपस्थिति दाखवित आहेत. असा हा सर्वधर्मसमभाव व हिंदू – मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला साई मित्र मंडळाचा माघी गणेशोत्सव तालुक्यात चर्चेत आहे.
कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे नेहमीच या मंडळाला सहकार्य असते . दरवर्षी ते सपत्नीक येवून ” श्री ” चे दर्शन घेतात. हा गणेशोत्सवाचा वारसा आता पुढील पिढी अध्यक्ष आदिब नदीम खान , उपाध्यक्ष ध्रुव कांबळे , सचिव अली खान , सहसचिव आमान अधिकारी , खजिनदार विराज राठी , सह खजिनदार लौकिक कांबळे , कार्याध्यक्ष अथर्व गुरव , सह कार्याध्यक्ष पारितोष खांगटे हि उत्सव समिती सांभाळत आहेत . या उत्सवास साई नगर महिला मंडळ , छत्रपती शिवाजी महाराज मंडळ , मुस्लिम मशिद ट्रस्ट , धापया देवस्थान समिती , नुर – ए – इलाही यंग कमिटी , मटण – मच्छी मार्केट , कर्जत नगर परिषद , कर्जत पोलीस स्टेशन , राजू मंडप डेकोरेशन , सलीम मंडप डेकोरेशन , कर्जत एम एस ई बी यांचे नेहमीच सहकार्य असते , असे मत अध्यक्ष नदीम भाई खान यांनी व्यक्त केले , तर मंडळाचे आधारस्तंभ मजीद पापामिया मुजावर , जफर अब्दुल गनी मुल्ला , राबिया लतिफ मुल्ला , अखतरी सय्यदमिर मोमीन , वजीर सुलेमान मुजावर , श्रवण भाई गुप्ता यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या उत्सवात त्यांची आठवण नेहमीच येत असल्याची भावनिक खंत व्यक्त केली.