if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा :ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वे मेन्स फेडरेशन, लोणावळा व रोटरी क्लब लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय, पुणे यांच्या सहकार्याने मोफत डोळे तपासणी,मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया व अल्पदरात चष्मेवाटप शिबीराचे आयोजन दि.11 फेब्रुवारी रोजी लोणावळा रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म नं.1वर करण्यात आले. वरील शिबीरात 218 लोकांनी नेत्र तपासणी करुन घेतली.50 लोकांना अल्पदरात चष्मे देण्यात आले. तसेच 21 जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा सल्ला डॉक्टरांनी दिला
शिबीराचे उद्घाटन प्रसिध्द उद्योगपती नंदकुमार वाळंज व लोणावळा स्टेशन प्रबंधक राजपुत यांचे शुभ हस्ते करण्यात आले.डॉक्टर टीम, नर्स व हॉस्पीटल कर्मचारी यांना एआयआरआरएफ च्या पदाधिकाऱ्यांनी सन्मानित केले.तसेच सर्वांना एआयआरआरएफ शाखेच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरीचे दिलीप पवार, सचिव संजय गुरव तसेच दत्ता केदारी, मिलींद भोसले, सुरेश घोमोडे, विलास कांबळे, राम थरकुडे, सूलतान शेख, वि.वि गोसावी, सुनिल गोसावी, अशोक गायकवाड, श्रीराम लोभी, श्री. अनिल भोसले. श्री. अनिल वाघमारे, श्री. जयसिंग कांबळे, मस्के, प्रकाश लोखंडे , अशोक टाक, नंदु कचरे तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप पवार, मुस्तफा, नितीन कल्याण, नंदु जोशी यांनी परिश्रम घेतले.या शिबीरास धिरुभाई कल्याणजी, कौस्तुभ दामले, रेल्वे इन्स्टिट्युटचे सेक्रेटरी मयुर पाडाळे, विशाल गुरव (सेक्रेटरी एनआरएमयु लोणावळा), सुनिल तावरे, सागर अंभोरे या मान्यवरांनी भेटी दिल्या.