if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा : विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व डी.पी.मेहता कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या वर्गासाठी शासना तर्फे घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा सुनियोजितपणे पार पडली.
व्ही.पी.एस हायस्कूल हे मावळ तालुक्यातील सर्वात मोठे परीक्षा केंद्र म्हणून ओळखले जाते. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी या दोन्ही वर्गासाठी हे केंद्र होते. परीक्षा केंद्रावर इयत्ता पाचवीमधील 237 विद्यार्थी तसेच इयत्ता आठवी मधील 455 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 666 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तसेच 26 विद्यार्थी गैरहजर होते.
विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शालेय प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. जागोजागी दिशा दर्शक फलक लावून विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षा पर्यंत जाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था याकडे खास करून लक्ष देण्यात आले.
यावेळी परीक्षा केंद्राचे केंद्रसंचालक म्हणून प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापिका श्रीमती. सुनिता ढिले तर उपकेंद्रसंचालक म्हणून पर्यवेक्षिका श्रीमती.क्षमा देशपांडे यांनी जबाबदारी पार पाडली. परीक्षा पार पाडण्यासाठी शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी आणि सेवक सर्वांनीच आपापल्या भूमिका चोख पार पडल्या. परीक्षा पार पाडण्यासाठी शिक्षक संजय पालवे, शिवकुमार दहिफळे,वैभव सूर्यवंशी,महेश चोणगे,विठ्ठल खेडकर, मुकुंद शिंदे, श्री.रवींद्र गोसावी, पोपट राहिंज,दत्तात्रय सुरवसे, कुंडलिक आंबेकर आणि सचिन थोरात यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.
शासनातर्फे घेतल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण परीक्षेच्या नियोजना बदल सभेच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह विजय भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी सर्वांचे कौतुक केले.