if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
पवनानगर दि. 26 : शासनाच्या ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ अंतर्गत काले पवनानगर येथील कुटुंब सर्वेक्षण मोहीम आज पार पडली. सदर सर्वेक्षण मध्ये 430 कुटुंबातील 2114 सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यातील 25 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली असता सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती ग्रामसेवक रवींद्र वाडेकर यांनी दिली. ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ अंतर्गत ही सर्वेक्षण मोहीम संपूर्ण मावळात राबविण्यात येत आहे.
आमदार सुनील शेळके, प्रांत संदेश शिर्के, आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, विस्तार अधिकारी बाळासाहेब दरवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम मावळात राबविली जात असून आज काले पवनानगर प्रमाणे मावळातील कुसगाव, टाकवे, सुदुंबरे व इंदोरी ह्या गावांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली आहे. काले पवनानगर येथील सर्वेक्षणासाठी भारत काळे, तेजश्री होले यांनी झोन ऑफिसर म्हणून काम पाहिले. ह्या सर्वेक्षणासाठी काले पवनानगर वासियांनी संपूर्ण व्यवसाय बंद ठेवून सहकार्य केले.
तर आरोग्य तपासणीसाठी शिक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या समवेत विकास कालेकर, सचिन कालेकर, अनिल भालेराव, राजू मोहोळ, किशोर शिर्के, उमेश कुंभार, विलास वरघडे, अल्ताफ शेख आणि ग्रामपंचायत सदस्या छाया प्रकाश कालेकर व अमित कुंभार समवेत सर्व पक्षीय सदस्यांनी स्वयंसेवक म्हणून मोहिमेत सहकार्य केले.आरोग्य तपासणी मोहिमेसाठी नऊ टीमचे नियोजन करण्यात आले होते. नियोजित नऊ टीमने गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची थर्मामीटर व ऑक्सिमीटरने ऑक्सिजन पातळी व तापमान तपासणी करून ताप, मधुमेह, उच्च रक्तदाब, सर्दी, खोकला, घसा दुखणे व थकवा येणे अशा प्रकारचा कोणाला त्रास आहे का याची नोंद टीममार्फत घेण्यात आली. सदर आरोग्य तपासणी दरम्यान सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने पवनानगर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.