Wednesday, January 15, 2025
Homeपुणेलोणावळालोणावळा शहरात एकाच रात्रीत नऊ दुकाने चोरट्याने फोडले..

लोणावळा शहरात एकाच रात्रीत नऊ दुकाने चोरट्याने फोडले..

लोणावळा – शहरातील प्रसिद्ध असलेल्या नाकोडा कॉम्प्लेक्स व बाजार परिसरात रविवारी 10 मार्च रात्री 11 ते सोमवारी 11 मार्च सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान नाकोडा कॉम्प्लेक्स व बाजार परिसरात एकाच ठिकाणी तब्बल नऊ चोऱ्या उघडकीस आल्या आहेत. यावेळी चोरट्यांनी दुकाने, कार्यालय यांचे शटर उचकटून, कुलूप तोडून या चोऱ्या केल्या आहेत.
वरील नऊ ठिकाणी झालेल्या चोरीत चोरट्याने लॅपटॉप, टिव्ही, रोख रक्कम, ब्रेकर इलेक्ट्रॉनिक मशीन, मोबाईल असा 98 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल चोरला आहे.
याप्रकरणी प्रज्वल संदिप निंबोकर (वय 24 वर्षे व्यवसाय-रिकव्हरी एजन्सी रा. टीचर्स कॉलणी, शिवाजी चौक, तुंगार्ली, लोणावळा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
इंटरप्राईजेस रिकव्हरी एजन्सी ऑफिस गाळा नं.17 व शेजारील व आजु बाजुचे गाळा दुकानदार मालक 1) उमेश रुपनारायण कुमावत, 2) डॉ. प्रशांत प्रकाश पाठक, 3) राज नारायण गवळी, 4) दिनेश नामदेव पवार, 5) समीर हरुन सय्यद, मँनेजर द मुस्लीम काँ-बँक शाखा नाकोडा कॉम्पलेक्स, लोणावळा, 6) मनिष दिलीप मनोजा, 7) ऑल इंडिया रिटार्यड रेल्वेमेन्स फेडरेशन ऑफिस 8) गणेश विठ्ठल निकोडे, 9) अलत्तमश फारुख शेख यांची दुकाने व कार्यालये त्याठिकाणी सदरच्या चोऱ्या झाल्या आहेत.
चोरीचे अनेक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मयूर आबनावे या प्रकरणी तपास करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page