if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
शेतकरी – गावकरी यांना पावसाळ्यात धोका , ” भाजप किसान मोर्चा ” आक्रमक…
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) शासकीय प्रशासनाच्या नोटीसला न जुमानता ” बेकायदेशीर बेधडक ” काम करून पावसाळ्यात शेतकरी , गावकरी यांना ” कर्दनकाळ ” ठरणारे उल्हास नदी पात्रातील बेकायदेशीर बांधकाम आणि भरावाचे काम अद्यापी सुरूच असून या गंभीर प्रकरणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आक्रमक झाली असून , प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांच्या नेतृत्वाखाली आज कर्जत तहसील कार्यालयात ” क्रोध निवेदन ” देवून त्वरित हे काम न थांबल्यास ” आमरण उपोषणाचा ” इशारा देण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून कर्जत तालुक्यातील तमनाथ गावातील नदीच्या काठी सर्व्हे नं 29/1 मध्ये सर्व नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर काँक्रिटची भिंत आणि भराव काम सुरू आहे . ह्या कामामुळे नदीचा प्रवाह बाधित होत आहे , त्यामुळे आजूबाजुच्या गावांना पुराचा धोका निर्माण होऊन मोठया प्रमाणावर वित्तीय आणि जीवित हानी तसेच शेतीचे नुकसान होणार आहे . या कामाबाबत शेतकरी – गावकरी आणि विविध सामाजिक , राजकिय संघटना तक्रार करत आहेत. परंतु सरकारी यंत्रणा काही कारवाई करत नाही. फक्त नोटीस पाठवून गप्प असून कारवाई होत नसल्याने कोणाच्या ” वरदहस्ताने ” हे ग्रामस्थांच्या जीवावर उठणारे काम सुरू आहे ? हा प्रश्न निर्माण झालेला आहे.
जलसंपदा लघु पाटबंधारे यांचे कडे विचारणा केली असता , हे काम अनधिकृत असुन पूर नियंत्रण रेषेचे सर्व नियमांचे उल्लंघन झाले आहे , असे लेखी उत्तर दिले आहे. त्यांनी तीन नोटीस पाठवुन सुध्दा काम चालु आहे असे सांगितले. सर्वं नियम – अटी आणि सरकारी आदेश न जुमानता काम करणाऱ्या धन दांडग्यावर कारवाई करावी , अन्यथा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आणि शेतकरी ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी मंगळवार दि. १९ मार्च २०२४ पासुन लोकमान्य टिळक चौक कर्जत येथे ” आमरण उपोषण ” करणार असल्याचे ” क्रोध निवेदन ” तहसीलदार कर्जत शीतल रसाळ यांना देण्यात आले.
याप्रसंगी भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे , जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर , जिल्हा सरचिटणीस जनार्दन म्हसकर , जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र मांडे , विधानसभा समन्वयक विनायक पवार , मिलिंद भोईर आणि इतर गावकरी – शेतकरी उपस्थित होते.