if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील तमनाथ येथे उल्हास नदीपात्रात सर्व्हे नं 29/1 मध्ये गेले अनेक दिवस मोठया प्रमाणात भराव आणि काँक्रिटची भिंत बांधकाम बेकायदेशीर रित्या चालू होते . हे बांधकाम पूरनियंत्रण रेषेत सर्व नियमांचे उल्लंघन करून नदीचा प्रवाह बदलत आहे . त्यामुळे आजूबाजूच्या ५ ते ६ गावात नदीचे पाणी घुसून शेतीची , वित्तीय आणि जीवित हानी होणार , असे निदर्शनास आल्यावर गावकरी – शेतकरी संबधित विभागात तक्रार करू लागले , परंतु अधिकारी वर्ग दाद देत नव्हते . अखेरीस शेतकरी आणि नागरिक भाजप नेते सुनिल गोगटे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष यांचे कडे जाऊन आम्हाला न्याय मिळवून द्या , असे सांगू लागले , लागलीच सुनिल गोगटे आणि त्यांचे सहकारी यांनी दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून २९ फेब्रुवारी २०२४ रोजी तहसीलदार कर्जत यांना निवेदन देऊन ग्रामीण भागातील शेतकरी – कष्टकरी – आदिवासी बांधवांच्या जीवावर उठणारे हे बांधकाम , बेकायदेशीर भराव लगेच बंद करावे ,अन्यथा तीव्र आंदोलन किंवा आमरण उपोषण केले जाईल , असे सांगितले.
आचार संहितेमुळे आपणास उपोषण करता येणार नाही , आपण अन्य मार्गाने प्रश्न मार्गी लावावा , असे पत्र तहसीलदार यांनी दिले . मात्र काम बंद केले जात नव्हते , अखेर हे प्रकरण किरीट सोमय्या यांच्याकडे गेल्याने अखेर हे बेकायदेशीर काम आज बंद करून त्या वादग्रस्त बांधकामावर पाटबंधारे विभागाने नोटीस लावली असून संबंधित बांधकाम मालकांवर पोलीस कारवाई होणार असल्याचे मत , भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी व्यक्त केले आहे.
सदरहू बांधकाम हे बेकायदेशीर व नागरिकांना धोक्याचे आहे , असे असताना काम बंद करण्याची हिम्मत शासकीय अधिकारी का करत नव्हते ? ह्या अनधिकृत बांधकामास ” राजकिय वरदहस्त ” असल्यानेच ” बेबंदशाहीने ” जोराने काम चालू होते , असा आरोप भाजप नेते सुनील गोगटे यांनी उपस्थित केला असून कर्जत तहसीलदार शितल रसाळ आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी गुंटूरकर यांना पुन्हा पुन्हा निवेदन दिले होते . सबंधित बांधकाम हे पूरनियंत्रण रेषेत असून कोणतीही परवानगी दिलेली नाही तसेच बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत , परंतु ते काम बंद करत नाहीत असे उत्तर अधिकारी वर्ग देत होते . पुढील कारवाईसाठी वरिष्ठांना कळविले आहे , त्यांचे उत्तर आल्यावर पुढील कारवाई करू , असे सांगितले. संपूर्ण यंत्रणा राजकिय दबावाखाली काम करत आहे आणि वेळकाढूपणा करून काम रेटून चालू ठेवत होते असे जाणवत होते. म्हणून चिकाटीने पाठपुरावा करत भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ मा खासदार किरीट सोमय्या यांना आपण यांत लक्ष घालावे , अशी विनंती सुनील गोगटे यांनी केली. त्यांनी त्वरित लक्ष घालून सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि लगेच सर्व यंत्रणा कामाला लागली आणि लागलीच बांधकाम बंद करावे , अशी नोटीस साईटवर जाऊन लावली आणि काम बंद केले.
यावरच आम्ही थांबणार नसून संबंधित मालक, जबाबदार अधिकारी यांचे वर कारवाई आणि नदी पात्रात अनधिकृत झालेला भराव , बांधकाम त्वरित काढुन टाकण्यासाठी लढाई चालू ठेवणार असल्याचे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी सांगितले आहे.