Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडनॅशनल रेल्वे मजदुर युनियनचे कर्जत नेरळ शाखेचे " डॅशिंग अध्यक्ष " महेश...

नॅशनल रेल्वे मजदुर युनियनचे कर्जत नेरळ शाखेचे ” डॅशिंग अध्यक्ष ” महेश उर्फ पप्पू भोसले !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” हर जुल्म ऑर तुफान की चट्टान हमें ऊंची उड्डाण से क्या रोकेगी , हम परों से नहीं , अपने बुलंद हौसलों से उडते है “…….अशी गगनभेदी गर्जना करत कामगारांच्या न्याय हक्कासाठी प्रशासनाशी दंड ठोकून नेहमीच उभा असणारा नॅशनल रेल्वे मजदुर युनियनचे कर्जत – नेरळ शाखेचे डॅशिंग नेतृत्व अध्यक्ष महेश उर्फ पप्पू भोसले हे आजच्या मितीला कामगारांना न्याय देणारा रेल्वेचा ” सक्षम नेता ” म्हणावा लागेल . राष्ट्रीय नेते कॉ. वेणू नायर व कर्जत युनियनचे जेष्ठ सचिव राजेंद्र साळोखे यांच्या तालमीत शिकलेले महेश भोसले युनियनच्या प्रत्येक आंदोलनात अग्रेसर असतो.

कर्जत रेल्वे ” इलेक्ट्रिक इंजिनियर ” असे उच्चशिक्षित असलेले महेश उर्फ पप्पू भोसले हे गुंडगे – श्री संत रोहिदास नगर येथे रहात असून कर्जत रेल्वे सुशोभीकरण , पनवेल – कर्जत रेल्वे नवीन मार्ग काम यांत इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून त्यांचा खारीचा वाटा आहे . हे करत असताना युनियनचे कर्जत – नेरळ शाखेचे ते अध्यक्ष आहेत . कामगारांचे प्रश्न , समस्या सोडविण्यासाठी नेहमीच सक्षम असून अधिकारी वर्गाला सडेतोड उत्तर देवून मार्ग काढून कामगारांचे प्रश्न लिलया सोडवतात . जुनी पेन्शन , कायम स्वरुपी कामगार धोरण , यासाठी त्यांनी गेल्या महिन्यात ” भुख हडताल ” कर्जत स्थानकावर केले होते . तर युनियनच्या प्रत्येक आंदोलनात ते सक्षम भूमिका बजावत असतात.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व बहुजनांच्या आचार – विचार – शिक्षण – अधिकार यांचे रक्षणकर्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ” विचारांचा पगडा ” त्यांच्यावर असून त्यांचे विचारच मला न्याय हक्क अधिकाराची लढाई लढण्यास ” प्रेरणादायी ” आहेत , असे ते सांगतात . त्यांच्या प्रत्येक लढाईत सावली सारखी मागे उभी असलेली त्यांची पत्नी आर पी आय महिला कर्जत शहर अध्यक्षा सौ . वैशाली भोसले यांची साथ त्यांना नेहमीच असते . आज या लढवय्या कॉम. महेश उर्फ पप्पू भोसले यांचा ४ एप्रिल दिनी ४७ वा वाढदिवस चिरायू होवो , त्यांना यश प्राप्त होवो , त्यांचे आरोग्य अबाधित राहो , हिच ईश्वर चरणी प्रार्थना !
- Advertisment -

You cannot copy content of this page