(कर्जत:अष्टदिशा वृत्तसेवा) दि.२९.भिवपुरी कर्जत -कल्याण महामार्गावरील डिकसळ येथील सेंटर नाक्यावरील IDBI बँक आहे.परंतु त्या बँक मधील एटीएम जो आहे तो पूर्ण बेभरोसे काम करत आहे.ज्यावेळी नागरिक IDBI बँक एटीएम मधून पैसे काढत असताना मोबाईलवर खात्याचा अहवाल मॅसेजद्वारे येत असतो परन्तु पैसे मात्र नागरिकांना त्यावेळी येत नाही.
आणि तेच पैसे काही कालावधी नंतर किंवा एक दोन दिवसांनी पैसे पुन्हा आपल्या खात्यात जमा होत असतात,नागरिकांना जेव्हा तातडीने ए. टी. एम. मधून रुपये काढायचे असतात त्यावेळी मात्र एनवेळी रुपये न मिळाल्याने नागरिकांच्या पदरी निराशा येत आहे ,यावेळी परिसरातील स्थानिक नागरिकांची मागणी आहे कि,त्याप्रसंगी IDBI बँक यांनी एटीएम दुरुस्ती करून किंवा नवीन एटीएम मशीन बसवून बँक ग्राहकांची गैरसोय दूर करावी, अशी नाराजी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तरी IDBI बँक व्यवस्थापनाने ह्या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन संदर्भात योग्य ती तातडीने कारवाई करावी.