if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) मावळ लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. माधवी ताई नरेश जोशी यांच्या प्रचाराचा झंझावात आज पनवेल मध्ये पहाण्यास मिळाला . बहुपक्षीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असताना त्या सर्वांना लढत देण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ.माधवीताई नरेश जोशी या देखील प्रतिस्पर्धी म्हणून लढत आहेत.
आज दिनांक ५ मे रोजी मावळ येथील प्रचार यशस्वी झाल्यावर त्यांनी पनवेल मध्ये ” महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ” यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व प्रचाराला जोरदार सुरुवात केली.या प्रचार रॅली दरम्यान आपल्या मतदार संघातील प्रत्येक मतदार हा जागरूकतेने लोकशाहीचा भाग म्हणून वावरणारा असावा , त्याला लोकशाहीचे योग्य ज्ञान असावे , त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय , समान हक्क व परिसरात विकास घडावा या करिता ताईंचा विशेष प्रयत्न असणार आहे . या प्रचार दौऱ्या दरम्यान हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
” जनतेचा ध्यास – मावळचा विकास ” हाच नारा देत आज प्रचार यंत्रणेत असंख्य कार्यकर्ते , नेतेमंडळी , सुजाण मतदार या सर्वांच्याच माध्यमातून आज संपूर्ण पनवेल मध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ.माधवीताई नरेश जोशी यांच्या प्रचार दौऱ्याचा झंझावात घुमत होता . माधवी ताईंनी पनवेल मध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत प्रत्येक मतदारा सोबत हितगुज साधले. आपली निशाणी ” रिक्षा ” याचा प्रचार घराघरात करून बहुमताने निवडून द्या , असे आवाहन सर्वांना केले.
पनवेल तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची खूप मोठी ताकद आहे . तर ” श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ” यांना मानणारा वर्ग आहे . त्यातच धार्मिक संघटना देखील त्यांच्या पाठीशी उभी आहे . शिवाय देशात महागाई , भ्रष्टाचार , महिला अत्याचार , बेरोजगारी यावर मात करायची असेल तर वंचित बहुजन आघाडीला मत देवून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी मला निवडून द्या , व उमेदवार माधवीताईंच्या आजपर्यंतच्या कार्याचा झंझावत पाहता त्या भरघोस मतांनी विजयी होतील , याकरिता आपणा सर्वांच्या विशेष सहकार्याची जोड नेहमी अशीच राहो , असे मत वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ.माधवीताई नरेश जोशी यांनी व्यक्त केले.