Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा : माध्यमिक शालांत परीक्षा 10 वीचा निकाल जाहीर..

लोणावळा : माध्यमिक शालांत परीक्षा 10 वीचा निकाल जाहीर..

लोणावळा : सोमवार: राज्यातील माध्यमिक शालांत परीक्षेचा 10 वीचा निकाल आज जाहीर झाला असून संपूर्ण राज्याचा निकाल 96.4 टक्के लागला आहे. लोणावळा विभागाचा निकाल देखील 96 टक्के लागला आहे. लोणावळा विभागातील 20 शाळांपैकी 9 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे, तर 6 शाळांचा निकाल 90 टक्क्यांपेक्षा अधिक लागला आहे.
लोणावळा शहरातून एकूण 1303 विद्यार्थी मुख्य परीक्षेला बसले होते, त्यातील 1242 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
लोणावळा विभागातील डॉन बॉस्को हायस्कूल, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट, गुरुकुल इंग्रजी माध्यम शाळा, तुंग माध्यमिक विद्यालय, शांती सदन, सोजर माध्यमिक विद्यालय (कुरवंडे), आंतरभारती बालग्राम विद्यालय (भुशी), ऑल सेंट चर्च विद्यालय आणि संपर्क लिली विद्यालय (मळवली) या 9 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
तर, व्ही.पी.एस. हायस्कूलचा निकाल 92.92 टक्के, गुरुकुल मराठी माध्यमाचा 96.42 टक्के, पुरंदरे विद्यालयाचा 93.10 टक्के, लोणावळा नगरपरिषद पंडित नेहरू विद्यालयाचा 95.23 टक्के, नागनाथ विद्यालय (औंढे) चा 93.33 टक्के, बापूसाहेब भोंडे हायस्कूलचा 98.23 टक्के, डी.सी. हायस्कूल (खंडाळा) चा 86.27 टक्के, लोणावळा नगरपरिषद रामकृष्ण मोरे हायस्कूल (खंडाळा) चा 89.28 टक्के, शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय (भाजे) चा 88.34 टक्के, वामनराव हैबतराव देशमुख विद्यालय (देवघर) चा 87.50 टक्के, आणि लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक शाळेचा 89.65 टक्के असा निकाल लागला आहे. याशिवाय, कामशेत विभागातील कार्ला येथील श्री एकविरा विद्यामंदिर शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे.
लोणावळा विभागाच्या या यशस्वी निकालाबद्दल सर्व शाळा आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन!
- Advertisment -

You cannot copy content of this page