पिंपरी : ( प्रतिनिधी श्रावणी कामत ) पुणे करियर म्हणजे भावी जीवन कसे जगायचे याची निवड करण्याचा मार्ग आहे. तुम्हाला जे आवडतं आणि जे करायला जमतं त्यात करिअर करण्याचा विचार करा, आपल्या स्वभाव आणि आवडी निवडीनुसार करिअरची निवड करून नियोजनबद्ध अभ्यास केल्यास नक्की यश प्राप्त होते असे मार्गदर्शन करिअर मार्गदर्शक प्रा. विजयकुमार नवले यांनी केले.
आकुर्डी येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) या संस्थांच्या वतीने आकुर्डी, निगडी परिसरातील दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र, स्मृतिचन्ह देऊन गौरव करण्यात आला. दर्शन प्रकाश भागवत या विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण मिळाल्याबद्दल सायकल देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
सोमवारी आकुर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष गोपाळराव कुटे, गंगाराम काळभोर, शंकरराव पांढरकर, गोविंदराव काळभोर, शंकरराव काळभोर, प्रकाश काळभोर, विठ्ठल काळभोर, निलेश पांढरकर, विजय काळभोर, तुळशीराम काळभोर, संजय कुटे, गणेश संभाजी काळभोर, गणेश दातीर, नितीन कदम, विनायक काळभोर, संजय दातीर पाटील, सुनील काटे, विश्वास काळभोर, गणेश गजानन काळभोर, जालिंदर काळभोर, बाळासाहेब कुदळे, संतोष तरटे, सोमनाथ काळभोर, प्रवीण पांढरकर आदींसह यशस्वी विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
ज्ञानेश्वर लांडगे शांताराम गावडे विठ्ठल काळभोर यांनी विद्यार्थ्यांना शुभ आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या. पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे प्रा. डॉ. रामदास बिरादार यांनी साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे बारावीनंतरची प्रवेश प्रक्रिया आणि उपलब्ध कोर्सेस विषयी माहिती दिली.
प्रा. नवले यांनी सांगितले की, करिअरच्या रस्त्यावर वळण नाही घेता आले, तरी पुढच्या फाट्यावरून त्या रस्त्यावर जोडणाऱ्या रस्त्याने जाता येते. जर आवडीचे क्षेत्र मिळाले नाही, तर जे मिळाले आहे त्यात आवड निर्माण करून आपली क्षमता सिद्ध करता येते. ज्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर अभियांत्रिकी क्षेत्रात जायचे असेल त्यांनी बारावीचा अभ्यासक्रम सहा महिने अगोदर पूर्ण करून उर्वरित वेळेत प्रवेश परीक्षेच्या किमान शंभर सराव प्रश्नपत्रिका सोडवाव्यात त्यामुळे प्रवेश परीक्षेची भीती जाईल.
प्रा. रोहन मुळे, प्रा. शिवम सारसर आणि श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि सभासदांनी संयोजनात सहभाग घेतला.