Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत खालापूर मतदार संघात अनेकांचे शर्थीचे प्रयत्न !

कर्जत खालापूर मतदार संघात अनेकांचे शर्थीचे प्रयत्न !

स्टॅंडिंग आमदार म्हणून महेंद्र शेठ थोरवे उमेदवारीची बाजी मारणार का ?

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत खालापूर मतदार संघात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ” मीच आमदार होणार ” म्हणून अनेकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत . मात्र त्यासाठी ” ईच्छा शक्ती ” जरी असली तरी सर्व बाजूंनी ” राजयोग ” असणे खूप महत्त्वाचे आहे . मागील अनेक निवडणुकीचा अभ्यास केल्यास यातून ते दिसत असल्याने येणाऱ्या २०२४ सालच्या निवडणुकीत ” कोण बाजी मारणार ” याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

या मतदार संघाचे सध्याचे आमदार हे शिवसेनेचे महेंद्र शेठ थोरवे हे आहेत . तर महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे येथील नेते राजिप चे माजी उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे हे देखील विकास कार्याच्या जोरावर उमेदवारी मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत . भाजप मध्ये नुकतेच पक्ष प्रवेश केलेले माजी आमदार सुरेश भाऊ लाड हे देखील इच्छुक असल्याने त्यांची देखील गुप्त पद्धतीने उमेदवारी मिळण्यासाठी फिल्डींग लावली आहे.
भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी देखील जोरदार मोर्चे बांधणी करून तिकीट मिळावी म्हणून प्रयत्न करताना दिसत आहेत . भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी देखील आपल्या आजपर्यंतच्या कार्यावर जोर देत तिकीट मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत . महा आघाडीकडून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत हे उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार असल्याची चर्चा आहे , ते कर्जत न प मध्ये ३ वेळा नगरसेवक , गट नेते , असा त्यांचा राजकीय प्रवास आहे . तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे मा. राजिपचे अध्यक्ष सुरेश दादा टोकरे हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत.

महाराष्ट्रात सध्या शिवसेना – भाजप – राष्ट्रवादी काँगेस पक्ष ( अजित पवार ) – आर पी आय पक्ष हे सत्तेवर आहेत . तर विरोधी पक्ष म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरदचंद्र पवार ) – शेकाप हे कार्यरत आहेत . येणाऱ्या निवडणुकीत महायुती विरुद्ध आघाडी अशीच निवडणूक होईल , यांत शंकाच नसेल , कारण झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला फटका बसला आहे , तर आघाडीला आता विधानसभेच्या निवडणुकीत सत्तेवर यायचं आहे , म्हणून स्वतंत्र उभे राहून कुणीच निवडणुकीला सामोरे जाणार नाहीत.

ज्या पक्षाचे त्या त्या मतदार संघात आमदार असतील , त्यांनाच उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत , आणि आजपर्यंत अगदी तसेच घडले आहे , त्यामुळे महाराष्ट्राच्या पातळीवर होणाऱ्या जागा वाटपाचा फायदा कर्जत मतदार संघात होणार असल्याने पुन्हा एकदा १ हजार करोड निधी आणणारे विकास पुरुष कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनाच शिवसेनेची उमेदवारी मिळणार , हिच काळया दगडावरची रेघ म्हणावी लागेल . मात्र यामुळे मित्र पक्षातील अनेकांची स्वप्ने धुळीस मिळणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत . मला आमदार तर व्हायचय , ईच्छा शक्ती आहे , मात्र राज योगाचा अभाव असल्याने हे शक्य नाही , अशीच काहीशी परिस्थिती येथे येवून ठेपली आहे . अपक्ष उमेदवारी घेवुनही तेवढ्या मतांचा टप्पा पार करणे , हे ही अशक्य गोष्ट आहे . २०१४ साली शेकाप मधून उमेदवारी लढलेले महेंद्र शेठ थोरवे यांना ५५११३ मते पडली तर सुरेशभाऊ लाड यांना ५७०१३ इतकी मते मिळून ते फक्त १९०० मतांनी विजयी झाले होते , तर शिवसेनेचे हनुमंत पिंगळे यांना ४०७२१ मते पडली होती.
त्यानंतर २०१९ साली शिवसेनेचे उमेदवार महेंद्र शेठ थोरवे यांना १०२२०८ इतकी मते पडली , तर सुरेश भाऊ लाड यांना ८४१६२ मते मिळून त्यांचा १८०४६ इतक्या मतांनी पराभव झाला होता . त्यामुळे इतक्या मतांचा टप्पा पार करण्यासाठी अपक्ष उमेदवाराला ते शक्य गोष्ट नाही . महायुतीचे स्टॅंडिंग आमदार म्हणून महेंद्र शेठ थोरवे यांचे कार्य दमदार असल्याने व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अगदी ते जवळचे असल्याने ते सहजच उमेदवारी मिळवतील , तर आघाडीतून उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांचीच उमेदवारी ठरेल , यांत तिळमात्र शंका नसल्याने महायुतीतील उमेदवारी ” मलाच मिळेल ” हा दावा करणारे राष्ट्रवादी व भाजप पक्षातील व आघाडीतील इच्छुक उमेदवारांचे स्वप्न हे स्वप्नवतच रहाणार , पण या राजकीय पटलावर कधी काय होईल , हे देखील सांगता येत नाही , राजयोग असेल तो नक्कीच उमेदवारीची बाजी मारेल , अशीच परिस्थिती असल्याचे चित्र येथे दिसत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page