Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडपिंपळोली येथे भाजपाच्या वतीने " मुख्यमंत्री लाडकी बहिण " योजनेचे शिबिर संपन्न...

पिंपळोली येथे भाजपाच्या वतीने ” मुख्यमंत्री लाडकी बहिण ” योजनेचे शिबिर संपन्न !

कु. कौशल गुरुनाथ सोनावळे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्तुत्य उपक्रम..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) भारतीय जनता पार्टीचे पिंपळोली गावाचे शक्ती केंद्र प्रमुख गुरुनाथ सोनावळे यांचा मुलगा कौशल याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी पिंपळोली ग्रामपंचायत हद्दीतील सर्व महिला भगिनींसाठी ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ” या योजनेचे नोंदणी शिबिर बुधवार दिनांक १७ जुलै २०२४ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित केले होते . त्यास महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ३५ महिलांनी या शिबिरात नाव नोंदणी केली.


यावेळी आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी गुरुनाथ सोनावळे यांचे कौतुक केले . त्यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत आपल्या गावातील भगिनींना महाराष्ट्र शासनच्या योजनेचा लाभ कसा मिळवून देता येईल , यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. तर यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती सुद्धा सांगण्यात आली , त्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांचे जनसेवा कार्यालय , विठ्ठल नगर – कर्जत येथे सहाय्य केले जाईल असे सांगण्यात आले . अशाच पद्धतीने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी असे उपक्रम राबवून सामाजिक कार्य केले तर भारतीय जनता पार्टी कर्जत तालुक्यात ” नंबर वन” ची पार्टी व्हायला वेळ लागणार नाही , असे मत व्यक्त करत गुरुनाथ सोनावळे यांचे अभिनंदन केले , तर ग्रामीण भागात अश्या पद्धतीचे कोणी कार्यक्रम राबवू इच्छित असेल त्यास सर्व सहकार्य करण्यास मी आणि माझे सहकारी तयार आहोत , असे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी सांगितले.


याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांच्या समवेत मिनेष मसणे – जिल्हा कोषाध्यक्ष युवा मोर्चा , कर्जत शहर सरचिटणीस सूर्यकांत गुप्ता , प्रशांत उगले – जेष्ठ भाजप कार्यकर्ते , सर्वेश गोगटे – युवा मोर्चा कर्जत शहर अध्यक्ष , प्रसन्न मुने – सोशल मीडिया अध्यक्ष , आनंद सोनावळे – बूथ अध्यक्ष , आयोजक गुरुनाथ सोनावळे आणि इतर कार्यकर्ते , ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानून कु. कौशल यास वाढदिवसासाठी शुभाशीर्वाद दिले.

- Advertisment -

You cannot copy content of this page