Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत - खालापूर विधानसभा परिसरातील सर्व युवक - युवतींकरिता रोजगाराची सुवर्णसंधी !

कर्जत – खालापूर विधानसभा परिसरातील सर्व युवक – युवतींकरिता रोजगाराची सुवर्णसंधी !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) नेहमीच आपल्या कर्जत खालापूर मतदार संघात समाजपयोगी कार्य करून नागरिकांच्या मनात घर करून राहिलेले , ” साधी रहाणी – उच्च विचासरणी ” असलेले शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख तथा कर्जत नगर परिषदेचे ३ वेळा निवडून आलेले जेष्ठ नगरसेवक – गटनेते नितीन दादा सावंत यांनी आपल्या मतदार संघातील बेरोजगार तरुण – तरुणींना रोजगाराची संधी देवून त्यांचे भवितव्य उज्वल बनविणार आहेत . यासाठी त्यांनी भव्य रोजगार मेळावा शनिवार दिनांक ०३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ठीक ९ – ३० ते दुपारी २ वाजेपर्यंत रॉयल गार्डन – मंगल कार्यालय , कर्जत येथे आयोजित केला आहे.

सदर मेळाव्यात महाराष्ट्रातील ५० पेक्षा अधिक ” राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ” नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे . हि रोजगाराची संधी शिक्षण आठवी ते उच्च शिक्षण लाभार्थी पात्र असलेले वय वर्षे १८ ते ३० वयोगटापर्यंत असणार आहे . मेळाव्यास उपस्थित प्रत्येक उमेदवारास १०० % नोकरीची संधी मिळणार असून निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र व विविध नामांकित कंपन्यांमधून ” ऑन द जॉब ” ट्रेनिंगची रोजगार संधी उपलब्ध होणार आहे.

तरी रोजगाराची संधी घेवू इच्छिणाऱ्या तरुण – तरुणींनी मोबाईल क्रमांक ८४२१५२१०११ / २१०२१८२१८३ यावर संपर्क करावा , असे आवाहन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा नंदकुमार सावंत , मा. गटनेता – नगरसेवक , कर्जत नगरपरिषद यांनी सर्वांना केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page