Thursday, September 19, 2024
Homeपुणेलोणावळाएकेरी वाहतुकीचे उल्लंघन: १६० वाहन चालकांवर कारवाई..

एकेरी वाहतुकीचे उल्लंघन: १६० वाहन चालकांवर कारवाई..

लोणावळा : ( श्रावणी कामत ) लोणावळा शहरात वाहतुकीची सुरळीतता राखण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंद्रायणी पुल आणि रानडे हॉस्पिटल या मार्गांवर एकेरी वाहतुकीचे नियमन करण्यात आले असून, दिशादर्शक फलकही लावण्यात आले आहेत. तथापि, काही वाहन चालक वारंवार या आदेशांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले आहे.
या समस्येवर उपाय म्हणून, लोणावळा शहर पोलीस स्टेशनने आज विशेष मोहिम राबवली. या मोहिमेद्वारे, एकेरी मार्गाचे उल्लंघन करणाऱ्या १६० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, या वाहन चालकांनी एकेरी मार्गाचे आदेश पाळले नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली आहे.
पोलीस विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी एकेरी मार्गांच्या आदेशांचे पालन करावे. यामुळे वाहतुकीची समस्या कमी होईल आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल.
लोणावळा शहर पोलीस ठाणे यांच्या वतीने वाहन चालकांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी एकेरी मार्गाच्या नियमानुसार आपली वाहने चालवावीत आणि शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यास सहकार्य करावे.
- Advertisment -

You cannot copy content of this page