Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडरजपे जामरूंग ग्रामपंचायत हद्दीतील अनेक महिलांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश !

रजपे जामरूंग ग्रामपंचायत हद्दीतील अनेक महिलांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील ” रजपें व जामरुंग ” या ग्रामपंचायत हद्दीतील सामाजिक कार्यकर्त्या व बचत गटाच्या माध्यमातून अलौकनिय कार्य करून आदिवासी महिला भगिनींना सक्षम करण्याच्या उद्दात हेतूने अजून त्यांची प्रगती होण्यासाठी ” सीमा लालचंद घरत व लालचंद घरत ” यांनी व त्यांच्या नेतृत्वाखाली ३०० महिलांनी आज गुरुवार दिनांक ८ ऑगस्ट २०२४ रोजी ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला . हा पक्ष प्रवेशाचा सोहळा ” बाळासाहेब भवन ” येथे झाला.

लालचंद शेठ घरत व सीमा घरत यांचे कार्य या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे . मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकास कामांची घौडदौड सुरू आहे , सीमा ताई यांच्या माध्यमातून आदिवासी भगिनीं सरकारच्या माध्यमातून अजून सक्षम होण्यासाठी आज ” नारी शक्ती ” येथे एकवटलेली दिसून येत आहे , म्हणूनच आदिवासी बांधवांसाठी नक्कीच अधिक कार्य करण्यासाठी आपण सर्वतो प्रयत्न करू , ” स्वातंत्र्यवीर बिरसा मुंडा ” यांच्या ९ ऑगस्ट ” क्रांती दिनी ” मी असे आश्वासन देतो की , तुमचे जी कामे आहेत , ती पूर्ण करण्यासाठी शासकीय योजना तुमच्या पर्यंत पोहचविण्याचे काम आम्ही करू , असे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्वांना विश्वास दर्शवून मत व्यक्त केले . मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे दोन हफ्ते येणाऱ्या रक्षा बंधनाला राज्य सरकार देणार आहेत , आर्थिक संकटाला तोंड देणाऱ्या महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे , ३ सिलेंडर वर्षाला फ्री केले आहेत , घरकुल योजना आम्ही लवकरच सर्वाँना देणार आहोत , या मतदार संघातील आदिवासी समाजाची जी प्रलंबित कामे आजही आम्ही सातत्याने करत आहोत , या ५ वर्षात आम्ही विकास केला आहे , पुढील काळात अधिक कामे होतील , असा विश्वास त्यांनी दिला , सीमा घरत व लालचंद शेठ घरत यांनी शिवसेनेवर विश्वास दाखवून पक्ष प्रवेश केला म्हणून त्यांचे विशेष आभार व्यक्त करत सर्व महिलांचे हार्दिक स्वागत केले व भविष्यकाळात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दिले.
” सत्तेचा मलिदा ” खात महायुतीतील मित्र पक्षच विरोधका सारखे जवळ राहून ” खंजीर ” खुपसण्याचे जे कट कारस्थान करत आहेत , व विकास कामांबद्दल जहरी टिका करत आहेत, त्यांना येथील सुज्ञ जनता धडा शिकविल्या शिवाय रहाणार नाही , असा जबरी टोला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लगावला . सीमा घरत व लालचंद शेठ घरत शिवसेना शिंदे गटांमध्ये यावे , यासाठी अशोक भागा रसाळ (धोत्रे शिवसेना कार्यकर्ते ) व मालू शंकर शेळके (आंबिवली शिवसेना कार्यकर्ते ) यांनी विशेष प्रयत्न केले .

या पक्ष प्रवेशावेळी जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर , महिला जिल्हा सल्लागार सुरेखाताई शितोळे , तालुका प्रमुख रेश्मा म्हात्रे , मनीषाताई दळवी , सुनील रसाळ , रमेश मते , उपतालुकाप्रमुख दिलीप ताम्हाणे , मा. उपा सभापती मनोहर दादा थोरवे , अशोक रसाळ , सुनील भालीवडे , मालू शेळके , संदेश सावंत , पंढरीनाथ पिंपरकर , नाथा आगज , रामचंद्र मीणमीणे , विधानसभा युवा अध्यक्ष प्रसाद थोरवे , मनोज भोईर, राजेश भोईर त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक याप्रसंगी उपस्थित होते .
- Advertisment -

You cannot copy content of this page