Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडभाजप विधानसभा निवडणूक अध्यक्ष " किरण भाऊ ठाकरे " यांचा स्तुत्य उपक्रम...

भाजप विधानसभा निवडणूक अध्यक्ष ” किरण भाऊ ठाकरे ” यांचा स्तुत्य उपक्रम !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) सापाला न मारता त्याचे जीव वाचविणे हे निसर्गाच्या जीवन जगण्याचे चक्र जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आजच्या घडीला कोण करत असेल तर ते ” सर्पमित्र “. सापाला वाचविणे व माणसाला देखील सापापासून वाचविणे , असे दोघांचा जीव वाचवून सर्वांपासून अलिप्त असलेले ” सर्पमित्र ” खूप महान कार्य करत आहेत . सर्प मित्राला माहित असत साप हा आपला मित्र आहे , पण सापाला हे माहीत नसते , तरीही जीव धोक्यात घालून सर्पमित्र निस्वार्थ भावनेने काम करत असतो , असे सन्मानपूर्वक मत भारतीय जनता पक्षाचे कर्जत – खालापूर मतदार संघाचे निवडणूक प्रमुख किरण भाऊ ठाकरे यांनी आज शुक्रवार दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी नेरळ येथे सभागृहात ” नागपंचमीचे ” औचित्य साधून तालुक्यातील महान कार्य करत असलेल्या ” सर्पमित्रांचा ” सत्कार सोहळा आयोजित केला होता , त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी , निवडणूक प्रमुख व कार्यक्रमाचे आयोजक किरण भाऊ ठाकरे , जिल्हा सचिव दिपक बेहेरे , नेरळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शिवाजीराव ढवळे , तालुका अध्यक्ष राजेश दादा भगत , नरेश मसने , संतोष सिंगारे , महिला तालुका अध्यक्षा नम्रता कांदळगावकर , श्रद्धा कराळे , किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर , महाडिक , प्रज्ञेश खेडकर , किशोर ठाकरे व इतर भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी किरण भाऊ ठाकरे यांनी ४२ सर्पमित्रांना शाल , पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून सन्मानित केले . आपल्या सांस्कृतिक सणांचे जतन करणे गरजेचे असून आज ” नागपंचमी ” असल्याने साप हे शेतकरी बांधव व आपल्या सर्वांचे मित्रच आहेत , हि भावना रूढ होण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे किरण भाऊ ठाकरे यांनी सांगितले . या सृष्टीत असलेले साप कुठे घरात आपल्या परिसरात ” फणा ” काढून फुत्कार काढत दिसल्यास ते साप चावतात की काय ? हि भीती बाहेर काढून सर्पमित्र खूप मोठं कौतुकास्पद कार्य करत असतात , तर साप व माणूस या दोघांचेही प्राण वाचविण्याचे महान कार्य केले जाते , यावर त्यांनी प्रकाश टाकत साप चावल्यावर घाबरून जाऊ नये , असा सल्ला देखील याप्रसंगी त्यांनी दिला . अशा या समाजातील महान कार्य करणाऱ्या मात्र दुर्लक्षित असलेल्या घटकांचा सर्पमित्र या बांधवांचा सत्कार होण गरजेचे आहे , असे मत त्यांनी व्यक्त करत भाजप नेहमीच शेवटच्या घटकाला प्रवाहात आणून ” न्याय व सन्मान ” देण्याचे कार्य करतो , असे मत निवडणूक प्रमुख किरण भाऊ ठाकरे यांनी व्यक्त केले.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी भाजप म्हणजे शेवटच्या घटका पर्यंत पोहचणे त्याला पुढे आणणे त्याची प्रगती करणे , असे कार्य करत असल्याचे त्यांनी सांगून किरण ठाकरे यांनी केलेल्या कार्यक्रमाची स्तुती केली . बुलढाणा येथील सर्पमित्र वनिता बोराडे हिने ५१ हजार साप पकडले , हे खूप मोठे कार्य असून आज फोन डायरीत सर्प मित्रांची देखील नावे व नंबर देणे गरजेचे आहे , असे मार्गदर्शन त्यांनी केले . तर नेरळ पोलीस ठाण्याचे निरिक्षक शिवाजीराव ढवळे यांनी साप पकडणे खूप ” जिगरबाज ” काम आहे , असे गौरोदगार काढून , दंश केल्यास जीव जाणार असे असले तरी खूप धाडसाचे काम सर्पमित्र करत असतात , आज नागपंचमीच्या दिवशी भाजपाने त्यांचा सत्कार करून खूप मोठे कार्य केले आहे , असे मत व्यक्त केले . भाजप ता. अध्यक्ष राजेश भगत यांनी जसे आपण कुत्रा पाळतो तसेच सर्प देखील पाळण्यात यावे , अशी मागणी करत सर्पमित्र यांच्या महान कार्याचा सन्मान होणे गरजेचे असल्याचे सांगितले . आज निसर्गाचा -हास होत आहे , ” एक वृक्ष आईसाठी ” अशी एक संकल्पना देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी केली आहे , असे मत व्यक्त केले.

यावेळी सर्पमित्र अभिजित घरत यांनी सर्प मित्राला आय डी कार्ड व इन्शुरन्स मिळावे ही प्रमुख मागणी केली आहे , जीवाशी खेळत असताना अपघात होण्याची शक्यता असते , तर सर्व सर्पमित्र निस्वार्थ पणे काम करत असताना शासनाचे देखील काम आम्ही करत असल्याने शासनाने देखील आमची सुरक्षा घ्यावी , ही विनंती मागणी केली ,याप्रसंगी सर्पमित्र मिथीलेश जोशी , प्रवीण तावडे , रोशन गलांडे , हर्ष सोनावणे , चेतन चौधरी , नितेश पवार , संतोष ताम्हाणे , अभिजित घरत , तुषार कांबळे , श्याम कडव , नवीन मोरे , आशिष वर्मा , सुकृत गोठसकर , राज पोटे , सुशील गुप्ता , अमोघ ठकेकर , वृषभ खोपटकर , सागर ढेबे , हर्षद लोभी , प्रसाद भगत , नितीन पाटील , वैभव पटवर्धन , राजेश ठाकरे , प्रेम कांबळे , सौरभ म्हसे , राज वाघेला , समर्थ खराडे , अनिकेत घोरपडे , सूरज कोळी , आशिष काकडे , अशोक विश्वकर्मा , योगेश शिंदे , विशाल साळुंखे , सुंदर शर्मा , धर्मेंद्र रावळ , सागर जाधव , संदीप उपाध्ये , अनुज गुप्ता , अक्षय गुप्ता , प्रखर गुप्ता , अविष्कार कांबळे , अरविंद गुरव , अश्या ४२ ” सर्प मित्रांचा ” सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आसावरी काळे मॅडम यांनी केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page