Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" एकच नारा , किरण भाऊ ठाकरे हमारा " भाजप कर्जत विधानसभा...

” एकच नारा , किरण भाऊ ठाकरे हमारा ” भाजप कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण भाऊ ठाकरे यांचे वाढते प्रस्थ !

कळंब येथील अनेकांचा ” भाजपात ” पक्ष प्रवेश…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यात नेरळ येथे नुकत्याच झालेल्या ” हिंदू धर्म संरक्षण मोर्च्यात ” फक्त भाजपाचे विधानसभा अध्यक्ष किरण भाऊ ठाकरे उपस्थित राहून हिंदू बांधवांच्या पाठीशी ठाम उभे राहिल्याने त्यांच्या ” हिंदू धर्म संरक्षक ” या प्रखड भूमिकेमुळे संपूर्ण तालुक्यात ते प्रसिद्धीच्या झोतात आले . या त्यांच्या भूमिकेवर आकर्षित होत तालुक्यातील कळंब जिल्हा परिषद विभागातील गरुड पाडा येथील अनेक तरुण कार्यकर्त्यांनी किरण भाऊ ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला . भाजप विधानसभा अध्यक्ष किरण भाऊ ठाकरे हे आमदारकीच्या शर्यतीत असल्याने हा पक्ष प्रवेश त्यांचे हात बळकट करण्यास उपयुक्त ठरणार आहे.

यावेळी मयूर बाळकृष्ण खुणे , दीपक बाळकृष्ण खुणे , सचिन मंगल मोरे , संतोष मारुती खुणे , साईनाथ रसाळ , नयन शरद बदे , मिलिंद लक्ष्मण मोरे , जितेंद्र भरत बदे , प्रवीण लक्ष्मण मोरे , सुभाष बाळकृष्ण खुणे , योगेश पांडुरंग आगीवले , राजेश जयवंत बदे , अजय अरविंद बदे , दिनेश गोविंद डुकरे , संतोष यशवंत बदे या तरुणांनी पक्ष प्रवेश केला . यावेळी सर्वांनी ” एकच नारा , किरण भाऊ ठाकरे हमारा ” अश्या घोषणा दिल्या.

कर्जत खालापूर मतदार संघात भाजप विधानसभा अध्यक्ष किरण भाऊ ठाकरे यांच्या कार्याचा वारू सर्वत्र उधळत आहे . या मतदार संघात त्यांनी आणलेला ” लाखो ” रुपयांचा विकास निधी , ” परिवर्तन हेल्पलाईन ” च्या माध्यमातून सुरू असलेले समस्या निवारणीचे कार्य , यामुळे सर्वत्र त्यांचा ” बोलबाला ” सुरू आहे.

या पक्ष प्रवेश कार्यक्रमात भाजप विधानसभा अध्यक्ष किरण भाऊ ठाकरे यांच्या समवेत , संजय कराळे , प्रज्ञेश खेडकर , तसेच राजेंद्र नारायण बदे , राजेश विठ्ठल राणे , नितीन गोविंद डुकरे , शंकर दुंदा काठावले , गणपत पांडुरंग बदे , गौरव राजेंद्र बदे आदी भारतीय जनता पक्ष कळंब शाखा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page