if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा दि.०७:कृषी उत्पन्न बाजार समिती ,व्यापारी, दलाल यांच्या पिळवणुकीतून शेतकऱ्यांची सुटका करणारा व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालविषयी स्वातंत्र्य देणारा नवीन कृषी कायदा केंद्र सरकारने मंजूर केल्यानंतर महाराष्ट्रातील आघाडी सरकारने तो कायदा राज्यात लागू न करता त्यास स्थगितीचा आदेश दिला आहे.
त्याच्या निषेधार्थ,भाजपा लोणावळा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्य सरकारने दिलेला स्थगिती आदेश तत्काळ मागे घ्यावा,आणि केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यातील शेतकऱ्यांच्या फायद्याच्या तरतुदी स्पष्ट केल्या पाहिजेत यासारख्या मागण्या करत राज्यातील सत्ताधारी पक्ष नवीन कृषी कायद्याबद्दल शेतकरी व समाजात खोटा प्रचार करून भ्रम निर्माण करत असल्याचा आरोप भाजपा च्या वतीने यावेळी करण्यात आला आहे.
लोणावळा शहर शिवाजी चौक इथे हे आंदोलन करण्यात आले त्यावेळी लोणावळा शहर भाजपा चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.