Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची मुदत वाढविण्याची गरज…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची मुदत वाढविण्याची गरज…

अनेक महिला भगिनींची कागदपत्रे अर्धवट रिजेक्तेड माहिती उशिरा समजल्याने सर्वांचीच धावपळ..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ०१ जुलै २०२४ रोजी अंमलात आली . त्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपत असून या कालावधी पर्यंत ज्या महिला भगिनी अर्ज भरून त्यात समाविष्ट असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करतील , त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे . मात्र या योजनेतील महिला भगिनींना आपले अर्ज रिजेक्तेड झाल्याचे उशिरा मेसेज किंवा माहिती मिळाल्याने उर्वरित चार दिवसांत त्याची पूर्तता होणार नसल्याने , या महत्त्वपूर्ण योजनेची मुदत अजून वाढविण्याची मागणी महिला वर्गातून जोर धरू लागली आहे.
या महत्त्वपूर्ण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी शाळा सोडल्याचा दाखला , केसरी किंवा पिवळे रेशनकार्ड , आधार कार्ड , रहिवासी दाखला , बँक खाते पासबुक , आदी कागदपत्रे लावण्याचे बंधन होते . मात्र यामध्ये अनेकांचे शाळा सोडल्याचे दाखले उपलब्ध नसल्याने जिथे शाळा सोडली तिकडे जाऊन त्यांना आणावे लागले . तर अनेक नवीन लग्न झालेल्या महिलांची माहेरच्या रेशन कार्ड मधून नावे कमी करणे , नवीन नावाचे लग्न प्रमाणपत्रे तयार नव्हती त्यामुळे सासरच्या नावाचे आधारकार्ड बनले गेले नव्हते , त्या कामास देखील खूप अवधी गेला . अजूनही ही कामे झाली नसल्याने रेशन कार्ड मध्ये देखील त्यांची नावे अद्यापी समाविष्ट होण्याची प्रक्रिया अजून बाकी आहे . तर बँक खाते देखील अनेकांनी मोबाईल लिंक , आधार कार्ड सिडिंग झाल्याची प्रक्रिया अद्यापी झाली नसल्याने बँकांत रोजच्या रोज गर्दी दिसत आहे . त्यातच बँकेत नेहमीची कामे , वीज खंडित होणे , गर्दीचे प्रमाण , नेट स्लो चालणे , शासकीय सुट्टया यामुळे अद्यापी सर्व महिला भगिनिंच्या समस्या ” आ ” वासून उभ्या आहेत.

त्यातच ज्या ज्या समस्या अर्धवट आहेत , त्या रीजेक्तेड झालेल्या अर्जाची माहिती उशिरा महिलांना समजल्याने आत्ता चार दिवसांत या प्रक्रिया पूर्ण होतील का ? अशी शंका असल्याने ३१ ऑगस्ट पर्यंत असलेली मुदत कमी पडत असल्याने मुदत वाढवून मिळावी , अश्या मागणीचा जोर महिला वर्गातून वाढत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page