भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) डी जे च्या तालावर , रिमझिम पावसात व हजारो कर्जत तालुक्यातील नागरिकांच्या उपस्थितीत ” आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन व शिवसेना कर्जत ” शहर आयोजित दहीहंडी उत्सवाची चर्चा थेट महाराष्ट्रभर झाली . लाखो रुपयांचे बक्षीस , लकी ड्रॉ , सलामी देणाऱ्या गोविन्दा पथकास १० हजारांचे बक्षीस , सेलिब्रिटी , व मान्यवरांची उपस्थितीत हा रंगलेला गोविन्दा उत्सव बघण्यासाठी चाहत्यांनी केलेली गर्दी तर सोशल मीडियावर ” १ लाख २६ हजार विव्ह ” मिळाल्याने ” दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांनी या गोविन्दा उत्सवाच्या निमित्ताने ” विक्रमच ” केला . हा गोविन्दा उत्सव मंगळवार दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता रॉयल गार्डन शेजारी मैदान कर्जत रायगड येथे आयोजित करण्यात आला होता.
या दहीहंडी उत्सवाला आमदार महेंद्र शेठ थोरवे हे उपस्थित राहून आलेल्या गोविंदाशी संवाद साधला . दहीहंडी उत्सव हा ” एकात्मतेचे प्रतीक ” आहे . हा उत्सव संपूर्ण देशभर साजरा केला जातो , महाराष्ट्र राज्यात शिवसेना प्रणित शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर व मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी गोविंदा पथकांसाठी ” विमा ” घोषित केला व प्रत्येक गोविंदाची काळजी व सुरक्षा घेण्याचे वचन दिले , त्यामुळे हा दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे . मी सर्व गोविंदां पदकांचे त्या निमित्ताने अभिनंदन करतो , आपण हा ” जल्लोषपूर्ण थरार ” या ठिकाणी अनुभवत आहात व दहीहंडीला सलामी देत आहात. तसेच कर्जतकरांनी या दहीहंडी महोत्सवाला जी साथ दिली त्याबद्दल समस्त कर्जतकरांचे देखील आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले.
या दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी व गोविंदा पथकांचे , उपस्थित कर्जतकरांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी राजा आदईकर (प्रसिद्ध गायक) , राहुल दादा पाटील (१००१ मथुर बैलाचे मालक ) , क्रांती रेडेकर (सिने अभिनेत्री) , विनायक माळी (युट्युब) , अक्षदा पाटील (रील स्टार) , अपूर्वा पाटील (रील स्टार) यांनी उपस्थिती लावली.
या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने कर्जत , खोपोली , लोणावळा , बदलापूर , पनवेल , नवी मुंबई , ठाणे , मुंबई , अश्या ३१ गोविन्दा पथकांनी आपली सलामी पूर्ण केली , यामध्ये महिला गोविंदा पथकाचा देखील सहभाग होता. या दहीहंडी उत्सवातील खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांकाचे १,२५०००/- हजार रु. पारितोषिक व मानाची दहीहंडी ” साई एकविरा गोविंदा पथक वडाळा ” यांनी फोडली. कर्जत तालुका मर्यादित मानाची दहीहंडी सलग दुसऱ्या वर्षी फोडण्याचा मान ” विठ्ठल रखुमाई आनंदवाडी नेरळ ” या गोविंदा पथकाने १,११०००/- रू. बक्षिस पटकावला.
याप्रसंगी पुरुष व महिलांसाठी भव्य ” लकी ड्रॉ ” चे देखील आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांमध्ये ड्रॉ घेऊन सर्वांना बक्षीसाचे वाटप देखील करण्यात आले. या सोहळ्यासाठी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , सौ. मीना ताई थोरवे , सौ. मनिषा ताई भासे , मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे , युवा अध्यक्ष प्रसाद थोरवे, तालुका प्रमुख संभाजी जगताप , संपर्क प्रमुख दिलीप ताम्हाणे , संघटक शिवराम बदे , जिल्हा सह संघटक अरुण देशमुख , युवा प्रमुख अमर मिसाळ , सनी चव्हाण , सुनील ठाकूर , संघटक नदीम भाई खान , उप शहर प्रमुख वैभव सुरावकर , मोरे , राकेश दळवी , शहर संघटक सायली शहासने , पंकज पवार , ओसवाल , ठाकरे , त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी , महिला आघाडी , युवा सेना कार्यकर्ते व असंख्य कर्जतकर उपस्थित होते.