Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेरळ व आपटी येथील अनेकांचा पक्ष प्रवेश संपन्न...

कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेरळ व आपटी येथील अनेकांचा पक्ष प्रवेश संपन्न !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आजच्या या पक्ष प्रवेशा निमित्ताने उपस्थित असलेले सर्व निष्ठावान कार्यकर्ते असून कामाची माणसे आहेत , मात्र बिनकामाची , आमिषाला भुलून उडाले ते ” कावळे ” व राहिले ते सच्चे ” मावळे ” असल्याचे गौरोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राजिप चे मा. उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी आज रविवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात नेरळ विभाग व खालापूर तालुक्यातील आपटी ग्रामपंचायत हद्दीतील सरपंच नितीन मोरे व सदस्य तसेच अनेकांचा पक्ष प्रवेश सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर सुधाकर भाऊ घारे यांच्या समवेत, प्रदेश महासचिव अशोक शेठ भोपतराव , जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ दादा धुळे , जिल्हा उपाध्यक्ष अशोक शेठ सावंत , खालापूर ता. अध्यक्ष संतोष बैलमारे , महिला कर्जत ता. अध्यक्षा ऍड. रंजना धुळे , कर्जत शहर अध्यक्ष तथा मा. नगरसेविका मधुरा चंदन पाटील , नगरसेविका भारती पालकर , शहर कार्याध्यक्ष मनिषा ठोंबरे , जिल्हा उपाध्यक्ष दीपक श्रीखंडे , प्रकाश पालकर , कविता शिंगवा , मंगला ऐंनकर , कर्जत ता. युवा अध्यक्ष स्वप्नील पालकर , बाळू थोरवे , युवा सचिव केतन बेलोसे , मा. उपसरपंच मधुकर भाऊ घारे , संतोष गुरव , नामदेव मोडक , चंद्रकांत देशमुख , उल्हास देशमुख , युक्ता भोपतराव , त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी व महिला वर्ग उपस्थित होते.

यावेळी सुधाकर भाऊ घारे यांनी आपली संघटना मजबूत होत आहे , प्रत्येक कार्यकर्ता पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहेत , म्हणूनच दर रविवारी मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश होत आहे , ग्रामीण भागातील शेवटचा कार्यकर्ता भेटत असून पक्ष प्रवेश होत आहे , म्हणूनच आज खालापूर तालुक्यातील आपटी गावातील सरपंच नितीन मोरे , व सहा सदस्य तसेच कविता शिंगवा यांच्या नेतृत्वाखाली नेरळ येथील अनेक कार्यकर्ते , महिलांनी आमच्यावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला आहे . विरोधक अनेकांना आमिशे देवून पक्ष प्रवेश करवून घेत आहेत , मग पाच वर्षे कुणाला कामे का दिली नाहीत , मात्र आताच का ? असा सवाल उपस्थित करत , मात्र येथील जनता सुज्ञ आहे , जे गेले ते ” लाचार ” असतील , म्हणून गेले , असा घणाघाती आरोप करत काहीना ” मानसन्मान ” पटत नाही त्यांना ” वळचनीला ” बसायची सवय आहे , असे खडे बोल त्यांनी सुनावले . माझा कार्यकर्ता , राष्ट्रवादीत का यायला पाहिजे ? ते समजावून सांगत आहेत , आम्ही विकास साधताना नेहमीच सन्मान करण्याचे काम केले , आता शेवटचा बजेट देखील संपला आहे , मग खोटी आश्वासन देवून का फसविले जात आहे , रोजगार मेळाव्यात किती बेरोजगारांना रोजगार दिला गेला , हे पाहण्याची गरज आहे , ” खोटे बोला पण रेटून बोला ” हेच विरोधकांनी केले . पाच वर्षात यांनी कुणासाठीही काही केले नाही , फक्त यांनी हुकुम शाही , अन्याय , अत्याचार , खोटे गुन्हे दाखल केले , यावर राष्ट्रवादीचे नेते सुधाकर भाऊ घारे यांनी प्रकाश टाकला . तरुणांना क्रीडा संकुल नाही , महिलांना रोजगाराची संधी नाही , हे प्रश्न भविष्यात विरोधकांना मतदारच विचारतील , असे सांगत माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय , खोटी केसेस कराल , तर सुधाकर भाऊ सर्वांच्या पाठीशी उभा राहून न्याय देईल , असे सर्वाँना त्यांनी आश्वासन दिले . मागे एकदा ” घरकुल वाटप करणार “, असे खोटे बोलून पक्ष प्रवेश करून आदिवासी बांधवांना फसविले , असा आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा प्रताप त्यांनी बोलून दाखविला . येणाऱ्या निवडणुकीत हे सर्व दिसणार आहे , मात्र आम्ही ” लढणार व निवडूनही येणार ” , असे आत्मविश्वासाने बोलत ” जो जिता वो ही सिकंदर ” , हे होणार आहे , मतदार संघाचा विकास नाही तर ” आमदारांनी ” स्वतःचा विकास केला , असा खुलासा त्यांनी सर्वांसमोर मांडला.

आम्ही विकास कार्य करताना १०० गावांना पाण्याची व्यवस्था केली , रस्ते , शाळा , वीज , यांचे प्रश्न सोडविले . मग यांनी कुठला विकास केला , असा प्रश्न , त्यांनी उपस्थित करत प्रवेश करणाऱ्या सर्वांचा आदर , गावाचा विकास , सर्वांच्या समस्या सोडविल्या जातील , मी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सर्व पदाधिकारी तुमच्या पाठीशी ठाम उभे असणार आहोत , असे आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिले . यावेळी प्रदेश महासचिव अशोक शेठ भोपत राव , खालापूर अध्यक्ष संतोष बैलमारे , जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ दादा धुळे यांनी देखील विरोधकांचा समाचार याप्रसंगी घेतला.
- Advertisment -

You cannot copy content of this page