Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईअभिनेते विकास थोरात यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर..

अभिनेते विकास थोरात यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर..

अभिनेते विकास थोरात यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर, स्व, हरींचंद्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर..

खोपोली- दत्तात्रय शेडगे
अभिनेते विकास थोरात यांना स्व, हरींचंद्र फाउंडेशनचा या वर्षीच्या राज्यस्तरीय राष्ट्रीय स्नेहबंध जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्व हरींचंद्र फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात.

त्याचप्रमाणे यावर्षीचा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार अभिनेता विकास थोरात (रा डोंबिवली ठाणे) यांना जाहीर झाला आहे. ठाणे शहरात एका सामान्य कुटूंबात जन्मलेले महापालिका शाळेत शिकलेले, डॉक्टरांकडे कंपाऊंडर म्हणून काम केलेले आणि ठाण्यात रिक्षा चालवुन उपजीविका करणारे विकास थोरत यांनी चित्रपट क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांनी आतापर्यंत लेले विरुध्द लेले, गाव तर चांगल, वडाची साल पिल्लाक, ही नाटके केली तर काटा रुते कोणाला, जय मल्हार, दुर्वा, लक्ष, बाळूमामा, लक्ष, अग्निहोत्र १, दिल दोस्ती दुनियादारी, डॉ बाबासाहेब आंबेडकर , तर झी मराठीवर गाजलेली मालिका रात्रीस खेल चाले या मालिकते त्यांनी काम केले तर बाबू बँड बाजा, एक होत माळीण, वीर शाहिद भाई कोतवाल, या चित्रपटात काम केले आहे, त्यामुळे त्यांनी आपली चित्रपट क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे याची दखल स्व हरींचंद्र फाउंडेशनने घेतली असून यांना राष्ट्रीय स्नेहबंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून लवकर त्यानं हा पुरस्कार बहाल केला जाणार आहे.
तर यांना या आधी ठाणे महानगरपालिकाच्या वतीने ठाणे गुणिजन पुरस्कार, महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र लोक गौरव पुरस्कार, आदींसह कला गौरव पुरस्कार, आधार रत्न पुरस्कार, जिल्हास्तरीय कलामित्र सन्मान पुरस्कारानी हे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

.

- Advertisment -

You cannot copy content of this page