if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
मावळ : वडगांव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यास 35 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवार दि. 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 07 वाजता वडगांव मावळ पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीत करण्यात आले. या प्रकरणी लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील तुळशीराम मगर ( वय 55),व पोलीस अंमलदार सागर कैलास गाडेकर (वय 34) यांना ताब्यात घेतले असून यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 च्या कलमान्वये गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार यांचे विरुद्ध वडगांव मावळ पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे फौजदारी पात्र गुन्हा दाखल असून, सदरचा गुन्हा लोकसेवक सुनिल मगर यांचेकडे तपासासाठी आहे. नमुद गुन्ह्याचे तपासात योग्य ती मदत करण्यासाठी लोकसेवक सुनिल मगर व लोकसेवक सागर गाडेकर यांनी तक्रारदार यांचेकडे 50,000/- रुपयाची लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.सदर तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक सुनिल मगर व लोकसेवक सागर गाडेकर यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 50,000/- रुपयांची लाच मागणी करुन, पंचासमक्ष तडजोडीअंती 35,000/- रुपयांची लाच मागणी करुन,दोघांनी तक्रारदार यांचेकडून रुपये 35,000/- लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली असता त्याना ताब्यात घेण्यात आले.
सदरची कारवाई ला. प्र. वि. पुणे परीक्षेत्र मा. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. तसेच कोणीही लोकसेवक शासकीय अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास सपंर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे.पुढील तपास ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करत आहेत.