भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात झालेल्या मारहाण व्हिडिओ व्हायरल प्रकरणी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा कुठलाच सहभाग नसताना झालेली भांडणे हि वैयक्तिक वादातून झाली असून , रस्त्यावर कुठलीही भांडणे झाल्यास त्याचा थेट संबंध कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या माथी मारून त्यांची बदनामी करत असल्याचे विरोधकांच्या ” कट कारस्थानाला ” चोख उत्तर देण्यासाठी कर्जत व खालापूर तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्यात तक्रार निवेदन देवून कर्जत खालापूर मतदार संघाचे महेंद्र शेठ थोरवे हे लोकप्रतिनिधी असताना चुकीच्या बातम्या पसरवीत असल्याने विरोधकांच्या विरोधात तक्रार अर्ज द्या , असे जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर यांनी सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना आदेश दिले आहेत.
आपले आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विरोधामध्ये चुकीच्या बातम्या प्रसार माध्यमातून पसरून बदनामी करण्याच्या उद्देशाने विरोधकांनी कटकारस्थान करत आहेत , म्हणून सर्व शिवसैनिकांनी आपापल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शुक्रवार दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ – ०० वाजता शिवसेना पदाधिकारी यांनी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.
यासाठी कर्जत ग्रामीण कर्जत शहर सकाळी ११ – ०० वाजता पोलीस ठाणे कर्जत , खोपोली शहर सकाळी ११ – ०० वाजता पोलीस ठाणे खोपोली , खालापूर ग्रामीण खालापूर शहर सकाळी ११ – ०० वाजता पोलीस ठाणे खालापूर , माथेरान शहर सकाळी ११ – ०० वाजता पोलीस ठाणे माथेरान , नेरळ शहर सकाळी ११ – ०० वाजता पोलीस ठाणे नेरळ वरीप्रमाणे शिवसैनिक पदाधिकारी ह्यांनी निवेदन देवून कारवाई करणेची मागणी करण्याचे आदेश रायगड जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर यांनी दिले आहेत . त्यामुळे हे प्रकरण आता चांगलेच तापणार असल्याचे दिसून येत आहे.