खालापूर -अमृतांजन ब्रिज जवळ साखरेच्या ट्रक पलटी, साखरेच्या पोत्याखाली चेंगरून एकाचा मृत्यू, मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरून कर्नाटक हुन मुबंई कडे साखर घेऊन जाणारा ट्रक अमृतांजन ब्रिज जवळ अपघड वळणावर पलटी होऊन भीषण अपघात झाला, या अपघातात साखरेच्या पोत्याखाली चेंगरून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरुन कर्नाटक हुन मुबंई कडे साखर घेऊन जात असताना ट्रक बोरघाटात अमृताजण ब्रिज जवळील अवघड उतारावर त्याचा ब्रेक फेल झाल्याने तो पलटी होऊन भीषण अपघात झाला.
साखरेच्या पोत्याखाली एकाचा चेंगरून मृत्यू झाल्याची घटना घडली या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, लोकमान्य हॉस्पिटलची यंत्रणा ,या0अपघात ग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत साखरेच्या पोत्याखाली चेंगरलेल्या इसमाला बाहेर काढण्यात तात्काळ मदत केली मात्र त्याचा मृत्यू झाला.