कळंब, वर्णे, वर्णे आदिवासी वाडी, तुकसई व चिंबोड ठाकूरवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश..
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत खालापूर मतदार संघ हा पारंपारिक शिवसेनेचा ” बालेकिल्ला ” राहिला आहे . हा गड पुन्हा एकदा भक्कम होण्यासाठी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली हा मतदार संघ विकास कार्यामुळे बहरून आला आहे . म्हणूनच शिवसेनेत मोठ्या संख्येने चहू बाजूंनी पक्ष प्रवेश होत असताना रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी पळसदरी ग्रामपंचायत हद्दीमधील वर्णे गावातील ग्रामस्थांचा तसेच कळंब, वर्णे आदिवासी वाडी, तुकसई व चिंबोड ठाकूरवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला . यामुळे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे हात मजबूत झाले असल्याचे चित्र येथे पहाण्यास मिळत आहे.
आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील वर्णे गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार देशमुख , दशरथ दरेकर , मनोहर देशमुख , प्रदीप देशमुख , स्वप्नील देशमुख , प्रभाकर देशमुख , शेखर देशमुख , गणेश देशमुख या प्रमुखांसहित त्यांचे असंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.
तर कळंब येथील उबाठा गटाचे कार्यकर्ते तथा तंटामुक्ती अध्यक्ष श्री. जनार्दन बदे , राष्ट्रवादीचे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. सुभाष वाघ, वर्णे येथील भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष श्री. नंदकुमार देशमुख व पळसदरी गाव भारतीय जनता पार्टीचे शक्तीप्रमुख श्री. दशरथ दरेकर यांचा समावेश आहे.
याप्रसंगी बोलताना आपण आज पक्षप्रवेश करत आहात , आपला मान सन्मान , आपली सर्व कामे मार्गी लावले जातील , अशा पद्धतीचा शब्द दिला. पळसदरी ग्रामपंचायत हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे व येणाऱ्या भविष्यकाळात देखील आपल्या सर्वांच्या एकजुटीने तो आपल्याच ताब्यात राहील असा विश्वास याप्रसंगी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी व्यक्त केला . या सर्वांच्या पक्ष प्रवेशामुळे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा झंझावात कायम असून येथील परिसर भगवेमय झाले आहे.
याप्रसंगी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत, रायगड जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर , शिवसेना कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप , विधानसभा युवा प्रमुख प्रसाद थोरवे , युवा प्रमुख अमर मिसाळ , उपतालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे, तसेच शिवसेना पक्षाचे कर्जत – खालापूर मतदार संघाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.