मी निवडणूक लढणार व मनसे सैनिकांच्या ताकदीवर निवडूनही येणार !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) अनेक यश – अपयश पचवत , अनेक संघर्षांना तोंड देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज सर्वत्र ” स्वाभिमानाने ताठ मानेने ” उभी आहे , ती फक्त आणि फक्त ” तरुण-हदय सम्राट , महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे ” यांच्यामुळेच . त्यांनी दिलेल्या आदेशाने जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून स्वाभिमानाने लढणारा फक्त ” मनसे सैनिकच ” असतो , म्हणूनच ईतर पक्षाचे गट तयार झालेले असताना आपली ओळख मनसे सैनिक कशी राहील , असे कार्य आपल्या परिसरात करा , व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा , असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मा. राज साहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय – कट्टर समर्थक मनसे रायगड जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र नव निर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांनी रॉयल गार्डन कर्जत येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष सत्कार समारंभ व पदनियुक्ती सोहळा रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित केला असता ते बोलत होते.
यावेळी या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील , उपजिल्हाध्यक्ष जे. पी. पाटील , जिल्हा सचिव अक्षय महाले , तालुका अध्यक्ष यशवंत दादा भवारे , वाहतूक सेना विधानसभा संघटक जयवंत कराळे , मा. तालुका सचिव व इलेक्शन मॅनेजमेंट प्रदीप पाटील , शहराध्यक्ष राजेश साळुंखे , उपशहर अध्यक्ष संकेत घेवारे , मयुरेश जोशी , शहर सल्लागार बाळा काणेकर , केतन पिंगळे , आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील पुढे म्हणाले की , नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष यशवंत भवारे यांच्यापुढे खूप मोठी आव्हाने आहेत , मात्र जिल्हाध्यक्ष म्हणून व आपल्या सर्व मनसे सैनिकांची ताकद त्यांच्या पाठीशी असेल , यावर त्यांनी प्रकाश टाकत या मतदार संघात या तालुक्यात विकास कामांत झालेला भ्रष्टाचार यासाठी आंदोलन छेडण्याचा आदेश त्यांनी तालुका अध्यक्ष यशवंत भवारे यांना दिला . आपल्या गावात , परिसरात , विभागात सर्वांनी नागरिकांची कामे करून महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे व सन्मानित राजसाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करा . येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र निवडणूक लढविणार आहे , असे समजल्यावर सर्वच पक्षात खळबळ उडाली आहे . लवकरच गाव भेट दौरा आयोजित करून नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाणार आहेत , तर नाराज कार्यकर्त्यांना भेटून त्यांचा गैरसमज दूर करून पक्षाची ताकद वाढविणार आहे.
कर्जत मतदार संघात मी निवडणूक लढण्यास इच्छुक असून आपल्या सर्वांच्या ताकदीवर मी निवडणूक लढविणार व निवडून हि येणार , अशी भीष्म गर्जना जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांनी केली .यावेळी शहर कार्यकारिणी पद नियुक्ती म्हणून उपशहराध्यक्ष अजित राऊत – भिसेगाव , गुंडगे शाखा व उपशाखा अध्यक्ष चेतन जंगम , शुभम नवले , नाना मास्तर नगर विभाग अध्यक्ष अमित चव्हान, रेव्हेन्यू कॉलनी शाखाध्यक्ष महेश लोवंशी, दहिवली विभाग अध्यक्ष महेंद्र आव्हाड अशी निवड करण्यात आली .
तर नवनिर्वाचित कर्जत तालुका अध्यक्ष यशवंत दादा भवारे व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमात विद्यार्थी सेना पदाधिकारी जिल्हा सचिव स्वप्नील शेळके , विद्यार्थी सेना कर्जत तालुका अध्यक्ष प्रवीण राणे , विद्यार्थी सेना माथेरान शहर अध्यक्ष सूरज कळंबे , विद्यार्थी सेना कर्जत शहर अध्यक्ष अवधूत अत्रे , त्याचप्रमाणे तालुक्यातील विविध कमिटी पदाधिकारी , मनसे सैनिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.