लोणावळा : विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शारदिय नवरात्री उत्सवानिमित्त विद्यार्थिनींसाठी प्रशालेच्या मैदानामध्ये व्ही.पी.एस हायस्कूल व व्ही.पी.एस प्राथमिक विभागातील विद्यार्थिनींसाठी एकत्रित महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले.
महाभोंडल्यानिमित्त कलाशिक्षक विक्रम शिंदे यांनी गजाचे सुंदर चित्र काढले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गजाच्या चित्राची पूजा करून महाभोंडल्याची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख धनंजय काळे आणि योगेश कोठावदे यांनी केले आणि त्यांना संजय पालवे, वैभव सूर्यवंशी, जयवंत सिसोदे, संकेत कवडे, श्रीकांत म्हसकर, शुभांगी कडू यांनी सहकार्य केले. यावेळी कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापक सुहास विसाळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंगल जाधव, पर्यवेक्षक विजय रसाळ, श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका क्षमा देशपांडे, शिक्षक प्रतिनिधी ज्योती डामसे आणि शिक्षकेतर प्रतिनिधी संजीवनी आंबेकर उपस्थित होत्या.
शिक्षिकांनी भोंडल्याची पारंपारिक गानि म्हणून आणि फेर धरून विद्यार्थिनींबरोबर भोंडल्याचा आनंद लुटला. यावर्षी विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शाळेने काही ठोस पावले उचलली असून याची सर्व कल्पना पालकांना देण्यात आली.
हायस्कूल मधील विद्यार्थिनी बरोबरच प्राथमिक विभागातील छोट्या विद्यार्थिनींनी देखील सुंदर फेर धरत गाण्याच्या ठेक्यावरती गरबा नृत्य केले.कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थिनींना खाऊचे वाटप करण्यात आले. खाऊचे वाटप करण्यासाठी शिक्षक वृंद आणि सेवक श्री.मुकुंद जगताप, सेविका श्रीमती आशा गवळी व इतरांचे सहकार्य लाभले. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल आणि महाभोंडल्याच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल नियामक मंडळ अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके, शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी शालेय प्रशासनाचे आणि नियोजकांचे कौतुक केले.