Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये " भजन भूषण गजाननबुवा पाटील " स्मारक व सभागृहाचे उद्घाटन उत्साहात...

कर्जतमध्ये ” भजन भूषण गजाननबुवा पाटील ” स्मारक व सभागृहाचे उद्घाटन उत्साहात !

” आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांनी दिलेला शब्द पूर्ण केला..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) सातत्याने ३२ वर्षे संघर्ष करून ज्या दिवसाची आपण वाट पहात होता तो ” सोनियाचा दिन आज अमृता पाहिला ” असाच असून ” दिव्य शक्ती ” असलेले ज्यांचा जन्म व मृत्यू हा एकाच दिवशी , त्या तारखेला झालेले ” भजन भूषण गजानन बुवा पाटील ” यांचे स्मारक आज कर्जत शहरात उल्हास नदीच्या तिरी , श्री विठ्ठलाच्या मूर्ती समोर साकारण्यात आल्याने आमदार झाल्यावर बुवांच्या कुटुंबीयांना दिलेला शब्द मी पूर्ण केला असल्याचे सद्गदित बोल , कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी व्यक्त केले . कर्जतमध्ये ” भजन भूषण गजाननबुवा पाटील ” स्मारक व सभागृहाचे उद्घाटन सोहळा आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते व मा. श्री रंभाजी बुवा पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच दिपक बुवा करोडे अध्यक्ष स्मारक समिती व अनेक मान्यवरांच्या साक्षीने सोमवार दिनांक ७ ऑक्टोंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता , स्थळ प्रती आळंदी – पंढरपूर , श्रीराम पुल जवळ मोठ्या उत्साहात संपन्न झाला , त्यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे बोलत होते .

यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभ हस्ते ” भजन भूषण गजानन बुवा पाटील ” यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी व्यासपीठावर आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , मा. राजिप बांधकाम व अर्थ सभापती बंधू पाटील , भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत शेठ भोईर , किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे , मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे , संघटक शिवराम बदे , मुरबाड येथील नेते उल्हास बांगर , संघटक पंकज पाटील , स्वरमनी प्रसाद बुवा पाटील , मा. नगरसेवक ऍड. संकेत भासे , भाजप ता. अध्यक्ष राजेश भगत , विधानसभा युवा प्रमुख प्रसाद थोरवे , नाना कारेकर , बुवांच्या मुली बेबी , शैला , संगीता , किशोर , रवि लाड , सुनील बुवा देशमुख , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , संघटक दिनेश कडू आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी सांगितले की , भजन कीर्तन गाणारे हे वेगळेच असतात , संगीत क्षेत्रातील दिव्य व महान कलावंत असे बुवा होते.
म्हणून भक्तीमय वातावरणात भजन किर्तनाने तुमचे पाप धुवून जाणार , मी पाच वर्षे समाजाचा राहून समाज कार्य केले , नेहमीच चेहरा समाजाकडे , पाठ घराकडे , केल्यानेच हे साध्य करू शकलो , यावर त्यांनी प्रकाश टाकला . पण हे जर उलटे झाले तर राजकीय अस्त होतो , असा सल्ला देखील त्यांनी दिला . कर्जत तालुक्यातील येथील कलाकार – कलावंत यांचे योगदान राज्यास – देशास असल्याचे त्यांनी गौरोदगार काढले . येथे निसर्गरम्य वातावरण असताना त्या बरोबरच भव्य दिव्य ऐतिहासिक स्मारक उभे केले , महाराष्ट्राची संस्कृती श्री विठ्ठल पंढरपूर आळंदी आहे . जशी इंद्रायणी तशी उल्हास नदी , मी माझे बाबांना शब्द दिला होता , आज सर्व सांस्कृतिक स्थळे निर्माण केली , जगात भारतीय संस्कृती सारखी कुठेच संस्कृती पहायला मिळणार नाही , श्री पंढरपूर याची तुलना कुठेच होवू शकत नाही , ” हम रहे ना रहे , मगर हमारी यादे रहेंगे , असे भावनिक मत व्यक्त केले . यावेळी त्यांनी स्वर्गीय सुरेश बुवा भोईर यांची आठवण काढली , हिरोजी इंदुलकर ज्यांनी छत्रपतींचे रायगडची उभारणी केली , त्यांची आठवण सांगितली , म्हणूनच सुरेश बुवांचे नाव भजन भूषण गजानन बुवा पाटील यांचे ” शिष्य ” म्हणून कोरले असल्याचे सांगितले . येथील होणाऱ्या सर्व कार्यक्रमास आम्ही अन्नदान देवून पुण्यकाम करू , असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.

यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना १९६९ साली एका कार्यक्रमास झाकीर हुसैन आले होते , गजानन बुवा तिथे गात होते , अप्रतिम गात असल्याने झाकीर हुसैन यांनी स्तुती केली , १९७५ च्या नांदी गायलेल्या आठवणी सांगितल्या , शांताराम जाधव , मगर , दत्ता कांबळे , यांची साथ त्यांना होती , ” सुवर्ण आणि परिमल ” हे भजन गाताना संगीत क्षेत्रातील सर्व प्रकार गाऊन सर्वाँना मंत्रमुग्ध केले , रात्री सुरू झालेली त्यांची संगीत रजनी सकाळ पर्यंत चालायची , सागम चां गणेशोत्सव हा बुवांचा भजन झाल्यावर सर्व कार्यक्रम सुरू व्हायचे , उत्तुंग सागराचे शिखर गाठणारे असे त्यांचे भजन असायचे , मिळालेली बिदागी ते गजाननाच्या चरणी अर्पण करायचे , अशी स्तुती सुमने सर्वांनी उधळली . यावेळी श्री कपालेश्वर मंदिर समिती , छत्रपती शिवाजी महाराज मंडळ , सागम , रमेश चंदन पाटील परिवार , शांताराम राऊत , हरिश्चंद्र दिघे , वसंत पाटील , मोहन पाटील , संभाजी तुपे , संभाजी भोईर , हरिश्चंद्र पाटील , चिंतामण पाटील , नथुराम राऊत , या सर्वांना सन्मानित करण्यात आले . मामा शेलार , गंगाराम बुवा वरासोलिकर , रमेश चंदन पाटील , सुरेश बुवा भोईर , हनुमंते काका , यांची आठवण सर्वांनी केली , कलाकाराला अहंकार हा शत्रू असतो , पण बुवा सारखे कलावंत होणे नाही , संगीत कला सर्वश्रेष्ठ कला आहे , मधुर संगीताने बरेच आजार निघून जातात , बुवा एक दिव्य शक्ती होती , ते गेल्या नंतरही ती गेलीच नाही , बुवा स्वराच्या माध्यमातून घराघरात आहेत , असे आठवणीत अनेकांनी म्हटले.

तर बंधू पाटील यांनी संगीत क्षेत्रातील भजन भूषण गजानन बुवा ” हिरा ” असल्याचे सांगितले. आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी चांगले कार्य करून ” विठुराया नंतर गजानन ” यांचे स्मारक बसविले , बुवा महान कलावंत पण अहंकार नव्हता , ” चीता-या , परिमालाची धाव , कानड्या तुझी घोंगडी , या भजनाना अवीट अशी चाल लावणे संगीत क्षेत्रातील गोडी असलेलाच करू शकतो , असा महान कलाकार परीस होते , ज्याला स्पर्श केला ते सुवर्ण झाले , असे गौरोद्गार काढले .वसंत शेठ भोईर यांनी त्यांची मुले पाटील घराण्यातील पाच रत्ने आहेत , त्यांच्या भजनात सामर्थ्य होत , बुवांकडे अहंकार नव्हता , या वास्तूत संगीत क्षेत्रात तरुण भजनी तयार होवून हा संगीत क्षेत्राचा वारसा पुढे चालत राहो , अशा शुभेच्छा दिल्या . तर उल्हास बांगर यांनी आमदार साहेबांची पहिलीच एन्ट्री असताना त्यांनी धडाकेबाज बॅटिंग केली , बैठक साता समुद्रापार नेणारे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे प्रवेशद्वार , प्रती पंढरपूर , व त्यालगत गजानन बुवांच स्मारक , असे नंदनवन झाल्याचे कार्य त्यांनी केले आहे , तुमचे जाहीर अभिनंदन करतो , असे सांगितले . दिपक करोडे यांनी हा स्मारकाचा प्रश्न आम्हाला सारखा सतावत होता , ५ वर्षापूर्वी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी शब्द दिला , आज हे स्मारक पूर्ण झाले , यांत थोरवे कुटुंबीयांचा सिंहाचा वाटा असून खूप सुंदर स्थळ आहे , आमचे भाग्य आहे . असे मत व्यक्त केले . प्रसाद बुवा पाटील यांनी गेली अनेक वर्षे फाईल फिरवण्यात गेले , ३२ वर्षांनी हे स्मारक होत आहे , आमदारांनी कौतुकास्पद कार्य केले , असे सांगितले व आपले वडील गजानन बुवा पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला . सुनील गोगटे यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे ” ते आले – त्यांनी बघितल – आणि त्यांनी हे सर्वांचे स्वप्न उभे केले , असे त्यांचे कौतुक केले . यावेळी सूत्र संचालन नितीन आरेकर यांनी करून रवी लाड यांनी आभार प्रदर्शन केले . यावेळी भजन भूषण गजानन बुवा पाटील स्मारक समिती व मोठ्या संख्येने कर्जतकर नागरिक उपस्थित होते . यावेळी संगीत रजनी हा कार्यक्रम ऐकण्यास मोठ्या संख्येने संगीत क्षेत्रातील कलावंत उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page