Thursday, November 21, 2024
Homeपुणेलोणावळाशौकत भाई शेख यांचा भाजप अल्पसंख्याक मोर्चा मावळ तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा..

शौकत भाई शेख यांचा भाजप अल्पसंख्याक मोर्चा मावळ तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा..

शौकत भाई शेख यांचा भाजप अल्पसंख्याक मोर्चा मावळ तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा, पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चेला उधाण..

लोणावळा : मावळ तालुक्यातील अल्पसंख्याक मोर्चाचे भाजप अध्यक्ष शौकत भाई शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. शेख यांनी राजीनाम्याच्या माध्यमातून वैयक्तिक कारणे दिली असून, त्यांच्या या निर्णयाने स्थानिक राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी भाजप मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय गुंड यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द केला आहे.
राजीनाम्यानंतरही समाजसेवेची बांधिलकी शेख यांनी राजीनाम्यानंतरही आपली सामाजिक बांधिलकी कायम ठेवण्याचे स्पष्ट केले आहे. “पद सोडले तरी माझं सामाजिक कार्य थांबणार नाही. स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून गोरगरीबांसाठी मोफत उपचार सुरूच राहतील,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वचनामुळे समाजातील अनेकांना दिलासा मिळाला आहे, कारण शेख यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक समाजाच्या अनेक आरोग्यविषयक समस्या मार्गी लागल्या आहेत.
राजकीय भूमिकेवर सर्वांच्या नजरा शेख यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीवर साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. त्यांना इतर पक्षांकडून जिल्हास्तरीय पदांसाठी ऑफर येत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत, ज्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चेला उधाण आले आहे.
मावळ तालुक्यात शेख यांची सामाजिक कामगिरी चांगलीच गाजली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गोरगरिबांसाठी केलेले आरोग्य शिबिरे, मोफत औषध वितरण, तसेच विविध सामाजिक उपक्रमांमुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे. राजीनाम्यानंतरही त्यांच्या कार्याचा हा प्रवास अविरत सुरू राहणार असल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले आहे.
शेख यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यांच्या पुढील पावलांवर सर्वांचे लक्ष केंद्रीत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page