Sunday, October 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमाथेरान मध्ये ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक , पदाधिकारी यांचा " अपक्ष उमेदवार...

माथेरान मध्ये ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक , पदाधिकारी यांचा ” अपक्ष उमेदवार सुधाकर भाऊ घारे ” यांना जाहीर पाठींबा !

” हा पाठींबा म्हणजे विजयाचे शुभ संकेत ” – सुधाकर भाऊ घारे ..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत खालापूर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार ” सुधाकर भाऊ घारे ” यांचा विजयी संपादन होण्यासाठी अनेक पक्ष संघटना त्यांना जाहीर पाठिंबा देवून साथ देत आहेत . यामुळे अपक्ष उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांचे पारडे दिवसेंदिवस जड होत असून नुकतेच शिवसेना ठाकरे गटाचे माथेरान गिरिस्थान येथील सर्व नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुधाकर भाऊ घारे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे . त्यामुळे ठाकरे शिवसेनेला हा खूप मोठा ” हादरा ” असून हि ” चिंगारी ” खूप मोठं ” रौद्र ” रूप धारण करणार , असेच काहीसे चित्र या मतदार संघात दिसून येत आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मा. नगरसेवक व संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांनी सांगितले की , या कर्जत – खालापूर मतदार संघात तिरंगी लढत झाल्यास शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नितीन सावंत हे ३ नंबर ला जाऊन त्याचा फायदा शिवसेनेच्या उमेदवारास होवू शकतो , यामुळे ठाकरे गटाचे नितीन सावंत यांचा पराभव होईल , असे आम्ही उध्दव साहेबांना सांगितले आहे , पण तरीही उमेदवारी देवून येथे तिरंगी लढत होणार आहे , यामुळे सर्वांची मते फुकट जाणार असतील तर तो आपला तोटा आहे , म्हणूनच तुल्यबळ असलेले उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांना आम्ही सर्व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक जाहीर पाठींबा देत आहोत . सदरचा पाठींबा आम्ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षात राहून देवू शकत नसल्याने आम्ही सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे ” पक्ष प्रमुख उध्दव साहेब ठाकरे ” यांच्याकडे पाठवत आहोत . येथील शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांचा फायदा होण्यासाठीच नितीन सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे ,असे गोपनीय राजकीय विश्लेषक यांचा अभ्यास असून यामुळे ” मशाल ” ३ नंबरला जाणार , व विरोधकांचा फायदा होणार , हे नको होण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक अपक्ष उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांना जाहीर पाठिंबा देत आहोत , असे सांगितले.

तर याप्रसंगी उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांनी माझ्या दृष्टीने हा ” आनंदाचा क्षण ” आहे , माथेरान येथील सर्वांनी मला जाहीर पाठींबा दिला आहे , हे ” शुभ संकेत ” आहेत , यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामे देवून मला पाठींबा दिला आहे , त्यांचे आभार व्यक्त करत तुमच्या सर्व सुखा दुःखात मी सदैव तुमची साथ देईन , तुमच्या बरोबर असेल , असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी माथेरान मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख – कुलदीप जाधव , प्रसाद सावंत – संपर्क प्रमुख , सागर पाटील – उपशहर प्रमुख , सौ परांदू प्र. मोरे – महिला शहरप्रमुख , सौ. सोनम दाभेकर – संपर्क शहर संघटिका ,सौ कीर्ती मोरे – सह संपर्क शहर संघटिका , सौ संजना शेलार – उप शहर संघटिका , सौ समिना महापुळे – उपशहर संघटिका , सौ तन्वी दाभेकर – तालुका युवती , रत्नदीप प्रधान – कामगार नेता , विवेक चौधरी मा. नगराध्यक्ष , सौ. प्रेरणा सावंत – माजी नगराध्यक्ष , शकील पटेल – मा. नगरसेवक , नरेश काळे – मा. नगरसेवक , ज्योती सोनावणे – मा. नगरसेविका , ऋतुजा प्रधान – मा. नगरसेवक , राजेश शिंदे – मा. नगरसेवक , नारायण कदम – मा. नगरसेवक , सुषमा जाधव – मा. नगरसेविका ,सौ. रजनी सावंत , फैजल महामुंळे , निमेश मेहता – युवा अधिकारी , श्रेयश गायकवाड – उपयुवा अधिकारी , अक्षय सोनवणे – उपयुवा अधिकारी , सौ. तन्वी दिघे – कर्जत उपयुवती अधिकारी , किशोर मोटे , नितीन वि. सावंत , सौ. संजना शेलार , आशिष सावंत , सिताराम शिंदे यांसह सर्व शिवसेना – युवा सेना , महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी राजीनामे देत , ” अपक्ष उमेदवार सुधाकर भाऊ घारे ” यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page