Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" भास्कर दिसले " यांची ताकद आपल्याला विजया पर्यंत नेणार - आमदार...

” भास्कर दिसले ” यांची ताकद आपल्याला विजया पर्यंत नेणार – आमदार महेंद्र शेठ थोरवे…

” कशेळे येथील ढाण्या वाघ शिवसेनेत “

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निष्ठावान राहून आपल्या पाथरज जिल्हा परिषद प्रभागात नेहमीच ” कडवी झुंज ” देणारा सेनापती व कशेळे या गावाचा ढाण्या वाघ तर माझा जीवा भावाचा मित्र भास्कर शेठ दिसले यांनी आज शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याने मला खूप आनंद झाला असून पाथरज जिल्हा परिषद प्रभागात त्यांची असलेली अभेद्य ताकद शिवसेनेला ” विजया ” पर्यंत नेणार , असे मत कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी ” शिवतीर्थ ” पोसरी येथे आयोजित केलेल्या पाथरज जिल्हा परिषद प्रभाग ज्यांच्या ताब्यात आहे असे भास्कर दिसले त्यांचा व त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते व महिलांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते . विशेष म्हणजे हा पक्ष प्रवेश सोहळा अर्धा तास सुरू होता.
या ” रेकॉर्ड ब्रेक ” पक्ष प्रवेशात पाथरज प्रभागातील घर नी घर सामील झाले होते . यावेळी व्यासपीठावर कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत पक्ष प्रवेश कर्ते भास्कर शेठ दिसले , जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , राजिप चे मा. अध्यक्ष सुरेश दादा टोकरे , जिल्हा संघटक संभाजी जगताप , मा. नगरसेवक बाळाजी विचारे , कर्जत ता. प्रमुख सुदाम पवाळी , उप तालुका प्रमुख दिलीप ताम्हाणे , आसवले , मा. राजिप सदस्या सौ. पूजा थोरवे , उप संपर्क प्रमुख अरुण देशमुख , संघटक शिवराम बदे , विधानसभा युवा प्रमुख प्रसाद थोरवे , युवा ता. प्रमुख अमर मिसाळ , रमेश मते , मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे , संकेत भासे , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे पुढे म्हणाले की , व्यासपीठ भरणे ही शिवसेनेची ताकद आहे , भास्कर दिसले यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे , त्यांचे मी आज स्वागत करतो . भास्कर दिसले हा अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता आहे , माझा जीवा भावाचा मित्र असल्याने खूप दिवसांपासून माझी इच्छा होती , माझ्या बरोबर येवून काम करावे , मी सन २०१४ साली शेकाप मधून निवडणुकीत उभा असताना माझा १९०० मतांनी पराभव झाला , त्यावेळी भास्कर दिसले यांनी राष्ट्रवादीचे ठाम राहून काम केले , पराभव हा विजयाची पहिली पायरी आहे , मी पराभव पचवला , तेंव्हा या मित्राने ” सांत्वन जेवण ” ठेवले , मी भेटायला गेलो , भेटल्यावर मात्र दोघेही रडलो , भास्कर म्हटला , तुमचा पराभव माझ्यामुळे झाला , सन २०१९ साली मी पुन्हा शिवसेनेतून उभा राहिलो , त्यावेळी देखील त्याने माझे काम केले नाही , पक्षाशी निष्ठावान राहिले , मात्र मी विजयी झालो . आज मी पुन्हा एकदा शिवसेना व महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीस सामोरे जात असताना पाथरज जिल्हा परिषद प्रभागात तळागाळात प्रचंड ताकद असलेला नेता भास्कर दिसले आज शिवसेनेत आले आहेत , त्यांची असलेली ताकद आपल्याला विजया पर्यंत नेणार , असे जोश पूर्ण मत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी व्यक्त केले.

या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे , भास्कर दिसले म्हणजे ” मैत्रीचा प्रतीक ” आहे , त्यांच्या सहित चार दिवसांपूर्वी या मतदार संघात मोठ्या दिग्गंजांचा पक्ष प्रवेश झाल्याने आपली ताकद वाढली आहे , सुरेश भाऊ लाड यांनी देखील ” विजयी भव ” असा आशीर्वाद दिला आहे , विरोधकांची कुटीर निती ओळखून सावध रहा , गाफील राहू नका , धनुष्य बाण वर मत देवून प्रचंड बहुमताने मला विजयी करून भगवा फडकवा , असे आवाहन आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी याप्रसंगी केले . हा विजयी प्रत्येक बूथ वर होणे गरजेचे आहे , ही निवडणूक सर्वांच्या प्रतिष्ठेची आहे , म्हणून साऱ्या शिव सैनिकांनी एकीची ” वज्रमूठ ” करा , आपण विजयी झालो पाहिजे , असा ” एल्गार ” त्यांनी केला . बुथवर कार्यकर्त्यांची फळी ठेवणार आहोत , विजयी झाल्यावर प्रत्येक शिवसैनिकांना ” शाबासकीची थाप प्रमाणपत्र ” देणार आहोत , बुथवर जास्त मते घेणाऱ्याला ” रोख रक्कम निधी ” दिला जाईल , असे आवाहन आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , उबाठा गटाच्या अनेकांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला .यावेळी भास्कर दिसले यांनी माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्या पूर्ण करण्यास उशीर झाला , पण काम फत्ते करूनच मी आज शिवसेनेत आलो आहे , मी कुठलेही आमिष घेवून पक्षात आलो नाही , मी गरिबीत दिवस काढले असल्याने , मला प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे , आज माझ्यावर विश्वास ठेवून अनेकांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला, त्यांचा मी आभारी आहे , असे मत व्यक्त केले .
- Advertisment -

You cannot copy content of this page