Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकडाव येथील आमदार महेंद्र थोरवेंच्या दहशतीचा जाहीर निषेध "..

कडाव येथील आमदार महेंद्र थोरवेंच्या दहशतीचा जाहीर निषेध “..

दहशत माजविणा-या आमदाराला मतदारांनी घरी बसवावे – सुधाकर भाऊ घारे..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांचा कडाव येथे प्रचारात गुंडगिरी करतांनाचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे .त्या प्रचारात शिवसेना महायुती व परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने मनोहर पाटील यांना दहशत दाखविण्याच्या घटनेचे तीव्र पडसाद आज उमटले असताना याविषयी अपक्ष उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांनी पत्रकार परिषद घेवून थोरवे यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. दहशत माजविणाऱ्या आमदार महेंद्र थोरवे यांना कर्जत मतदार संघातील मतदारांनी घरी बसवावे , असे आवाहन देखील त्यांनी करून त्यांच्या कृतीचा जाहीर निषेध करून याबाबतीत पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले .

यावेळी सुधाकर भाऊ घारे पुढे म्हणाले की , पाच वर्ष ज्यांनी या मतदारसंघाची आमदारकी भोगलेली आहे अशा माणसाने एका सत्तर वर्षीय ज्येष्ठाचा कडाव सारख्या मार्केट मध्ये असा अवमान करणं योग्य आहे का ? अशी दादागिरी करणे योग्य आहे का ? असा खोचक सवाल यावेळी घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना केला . मागच्या पाच वर्षामध्ये कोणाकोणाची भांडणे लावली ? कोणाकोणावरती भ्याड हल्ला घडवून आणला ? याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे ? हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे . यावर प्रकाश टाकत लोकप्रतिनिधी जर अशा पद्धतीने वागणार असेल आणि आपण जर सर्व डोळे मिटून गप्प बसणार असाल तर पुढच्या काळामध्ये येथील गोरगरीब जनतेला कोणी वाली राहणार नाही , तसेच माझ्या व्यापारी बंधूंना कोणाचा आधार राहणार नाही , माझ्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रमुखांना कोणाचा आधार राहणार नाही , म्हणूनच या प्रकरणामध्ये पोलीस यंत्रणा डोळे बंद करून बसणार असेल तर या अन्याया विरोधात मला वाचा फोडावी लागेल , असा इशारा सुधाकर भाऊ घारे यांनी पोलीस प्रशासनाला दिला , तर महेंद्र थोरवेंना पराभवाची चाहूल लागली आहे , म्हणून ते दहशत माजवित असल्याचा आरोप भरत भाई भगत यांनी केला .

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज साहेब ठाकरे आणि कर्जत खालापूरमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे विधानसभा निवडणुकीसाठी पाठींबा दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त करून आपल्या पाठिंब्यामुळे आपला विजयी निश्चित असल्याचे भाकीत त्यांनी सांगितले .

यावेळी सुधाकर भाऊ घारे यांच्या समवेत परिवर्तन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते भरत भाई भगत , दिपक श्रीखंडे , भगवान चंचे , एकनाथ दादा धुळे , राजेंद्र निगुडकर , मनोहर पाटील आणि अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. तर मनसे चे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील , जिल्हा सचिव अक्षय महाले, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कर्णूक , कर्जत तालुकाध्यक्ष यशवंत भवारे , ज्येष्ठ नेते प्रवीण गांगल , तालुकाध्यक्ष मिलिंद मिसाळ , भूषण राणे, दिनेश बोराडे, कर्जत शहर अध्यक्ष राजेश साळुंखे , नेरळ शहर अध्यक्ष सुभाष नाईक , मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष प्रवीण राणे , मनसे विद्यार्थी सेना कर्जत शहर अध्यक्ष अवधूत अत्रे , माथेरान शहर संघटक सुरज कळंबे , मा. नगरसेवक धनंजय दुर्गे , रायगड जिल्हाध्यक्ष पर्यावरण सेना अभिजित घरत आणि खालापूर तालुका उपाध्यक्ष अविनाश देशमुख आदी प्रमुख पदाधिकारी या पत्रकार परिषदेत उपस्थित होते .
- Advertisment -

You cannot copy content of this page