Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" जनतेच्या मनातील उमेदवार " शिवसेनेचा एकनिष्ठ शिलेदार " नितीन दादा सावंत...

” जनतेच्या मनातील उमेदवार ” शिवसेनेचा एकनिष्ठ शिलेदार ” नितीन दादा सावंत “….

२० तारखेला ” मशाल ” पेटवा व ” दादागिरी ” करणाऱ्या ” ठेकेदाराची ” सत्ता उलथून टाका – आदित्य ठाकरे.

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जत मतदार संघात ठेकेदारांची दादागिरी सुरू आहे , आपल्याला आता निष्ठावान उमेदवार निवडून द्यायचे आहे , टेबलावर नाचणारे आपले नाहीत , आता हा निर्णय तुम्हीच घ्या , २० तारखेला मशाल पेटवून गद्दारांची सत्ता उलथवून टाका , २३ नोव्हेंबरला सत्ता आपलीच येणार असून मग यांना लपायला जागा रहाणार नाही , अशी गर्जना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली . महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार ” नितीन दादा सावंत ” यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे युवा -हदय सम्राट , युवासेना प्रमुख आदित्य उध्दव साहेब ठाकरे यांची जाहीर सभा खोपोली डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौक येथे गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी ठीक ५ वाजता आयोजित केली होती . यावेळी ते बोलत होते .

यावेळी प्रथम त्यांनी सर्व मायबाप मतदारांना हात दाखवून मानवंदना दिली , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाले . याप्रसंगी व्यासपीठावर महा आघाडीचे उमेदवार नितीन दादा नंदकुमार सावंत , शिवसेनेचे नेते आमदार सचिन भाऊ अहिर , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत , बर्गे , कम्युनिस्ट पक्षाचे गोपाळ शेळके , जिल्हा महिला संघटीका रेखा ठाकरे , मा. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी , कर्जत ता. प्रमुख उत्तम दादा कोळंबे , खालापूर ता. प्रमुख एकनाथ पिंगळे , उप महिला संघटीका पाटील , पुरी , त्याचप्रमाणे महा आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते .

यावेळी येथील आमदार महेंद्र थोरवे यांचा समाचार घेताना ते म्हणाले की , येथील आमदाराची दादागिरी संपवायची आहे . नितीन आपण निष्ठावंत आहात , आपण उध्दव साहेबांबरोबर एकनिष्ठ राहिलात , गद्दारांकदे जाणारा लोंढा आपण थांबवला आहे , अशी ” शाबासकीची थाप ” उपजिल्हा प्रमुख तथा उमेदवार नितीन दादा सावंत यांना दिली . आताची ही लढाई खूप मोठी आहे , मुंबई अदानी च्या घश्यात देणार आहेत , हा धोका संपूर्ण महाराष्ट्राला आहे , भाजपाचे हे स्वप्न आहे , १ इंच जागा मुंबईत फुकट मिळत नाही तेथे अदानी ला करोडो रुपयांची जागा फुकट दिली जाते , यावर त्यांनी प्रकाश टाकला .

मोदीनी २०१४ मध्ये १५ लाख देणार असे घोषित केले होते , आता २०२४ मध्ये १५०० वर आले , त्याने घर चालत नाही , उध्दव साहेब ठाकरे यांचे सरकार आल्यावर ” महालक्ष्मी योजने ” अंतर्गत प्रत्येक महिला भगिनीस महिन्याला ” ३ हजार ” रु देणार , मोफत एस टी , बी एस टी सेवा देणार , युवा शक्ती बेरोजगार आहे , त्यांना या मतदार संघात काम देणार , मुलींना मोफत शिक्षण , चार हजार रु. बेरोजगार तरुणांना देणार , हे भाषण नाही , आपली वचने आहेत , असे सांगत आपले सरकार असताना १ लाख तरुणांना रोजगार देणार होतो , मात्र सरकार बदलले , आणि हा रोजगार गुजरातला नेला , डायमंड चा बाजार गुजरात , अनेक धंदे तिकडे गेले , याचा राग तुम्हाला येत नाही का ? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला . त्यांचे हिंदू रक्षण नकली आहे , आमचं स्वच्छ आहे , आरक्षण बद्दल चळवळ सुरू आहे , जरांगे पाटील यांना लाडीचार्ज कुणी केला फडणवीस की शिंदे ? असा संतप्त सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी मनसे वर देखील ताशेरे ओढत मनसे येथील भुमीपुत्रासाठी नाही तर गुजरात च्या रोजगारासाठी लढत आहेत , जात निहाय जण गणना आपण करणार , कोरोना काळात महाराष्ट्राला सुरक्षित ठेवणारा एकच उध्दव बाळासाहेब ठाकरे हे होते , आपण एकजूट राहिलो , महाराष्ट्र धर्म पाळणारे लोक आहोत , शेतमालाला भाव , रोजगार , महिलांना न्याय मिळाला पाहिजे , पण सावध रहा , जर विखुरलो गेलो तर भाजपच फावतो , ते सर्वाँना फोडण्याच काम करतील , आज भ्रष्टाचार , रोकायच असेल तर परिवर्तन हवंय , ” मशाल ” तुम्हाला न्याय देईल , असा आत्मविश्वास त्यांनी उपस्थितांना दाखवून नितीन सावंत यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा , असे आवाहन करत , सभेचा माहोल युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घोषणा देवून ज्वलंत केला . विशेष म्हणजे महा आघाडीतील मित्र पक्ष ” जयंत पाटील ” यांच्या ” शेतकरी कामगार पक्षाचा ” एक ही पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित नव्हता . यावेळी उमेदवार नितीन दादा सावंत यांनी सर्वांच्या सुखा दुःखात , समस्या , अडचणी यांत मी आपल्या मदतीला पाठीशी ठाम उभा राहणार , असे आश्वासन देत या मतदार संघाचा विकास करून बेरोजगारी हटविणार , असे आश्वासन दिले . यावेळी खोपोली पोलीस ठाण्याने चोख बंदोबस्त ठेवला होता .
- Advertisment -

You cannot copy content of this page