if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
” सुधाकर घारे ” राजिप चे उपाध्यक्ष असताना कुठले भरीव काम केले , अहवाल द्या , संतोष शेठ भोईर यांचे चॅलेंज !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जत खालापूर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे या विरोधकांकडे जनतेसाठी कुठलेच ” व्हिजन ” नाही , विरोध करणे , खोटा कावा करणे , हे एकच काम असल्याने ते येथील कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या बर बिनबुडाचे खोटे आरोप करत आहेत , सुधाकर घारे रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तसेच शिक्षण – आरोग्य – क्रिडा सभापती असताना त्यांनी कर्जत खालापूर मतदार संघातील जनतेसाठी कुठले भरीव काम केले आहे , याचा अहवाल सादर करावा , असे ” खुले चॅलेंज ” शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर यांनी आज गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी ” शिवतिर्थ ” येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत घारे यांच्यावर हल्ला चढवला .
यावेळी या पत्रकार परिषदेत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , उप जिल्हा प्रमुख भाई गायकर , जिल्हा संघटक संभाजी जगताप , आर पी आय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड , भाजप उपाध्यक्ष वसंत शेठ भोईर , आर पी आय कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल भाई डाळींबकर , भाजप जिल्हा नेते , तानाजी चव्हाण , मा. उपाध्यक्ष भाई शिंदे , ता प्रमुख संदेश पाटील , भाजप ता. अध्यक्ष राजेश भगत , किसान मोर्चा कोकण प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे , मा. नगराध्यक्ष डॉ . सुनील भाऊ पाटील , जिल्हा सचिव रमेश मुंडे , पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम , महेंद्र निगुडकर , संघटक अरुण देशमुख , शहर प्रमुख संजय मोहिते , त्याचप्रमाणे दोन्ही तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर विरोधकांचा समाचार घेताना पुढे म्हणाले की , विरोधक खोटा प्रचार करत आहेत , आमच्याकडे झालेल्या सर्व विकास कामांचे वर्क ऑर्डर आहेत , व निधी उपलब्ध केला त्यावेळेचे पत्र आम्ही आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या अहवालात याची सर्व माहिती दिली आहे . काहीतरी ” खोट्या वल्गना ” करायच्या आणि जनतेचे मन विचलित करायचं हा फक्त एकच उद्योग त्यांना असून पत्रकारांना त्यांनी हा अहवाल विरोधकांकडे पोहोच करा , अशी विनंती केली . घारे यांनी उपाध्यक्ष असताना त्यांचा अहवाल काढावा , असे आव्हान त्यांनी केले . त्यांनी जनतेसाठी कुठले भरीव कार्य केले आहे ? असा प्रश्र्न त्यांनी उपस्थित केला . फक्त गावची पूजा अर्चा करून व शर्यती घेवून गर्दी जमवली तर या निवडणुकीतील दुसरे उमेदवार फक्त ” कोपऱ्यावर बॅनर ” लावण्याचे काम केले आहेत . कार्यसम्राट आमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनीच ” भरीव काम ” केले आहे , म्हणूनच येथील जनता सुज्ञ आहे , त्यांना झालेला विकास दिसत आहे , ते खोट्या बोलण्याला बळी पडणार नाहीत , आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या ” धनुष्य बाणावर ” मत देवून ते प्रचंड बहुमताने निवडून येतील , असा विश्वास आम्हाला आहे , असे मत व्यक्त केले .
कडाव येथील प्रसंगात मी साक्षीदार आहे , आमदार साहेबांनी आप्पा , असा आवाज दिला , मनोहर पाटील हे तिहार जेलमध्ये बंद असताना त्यावेळी आमदार साहेबांनी त्यांना मदत केली होती , निदान हे उपकार लक्षात ठेवून त्यांनी विरोधकांचा प्रचार करताना समोर तरी येणे नको होते , तर ” मला धमकी देता का ” , असा खोटा कावा त्यांनी केला असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले . या मतदार संघावर महायुतीचा भगवाच फडकणार व कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे बहुमताने निवडून येणार , असे भाकीत त्यांनी जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर यांनी व्यक्त केले .