if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा येथील संगणक अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी विनायक जालान यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) बी.ई. परीक्षेत संगणक अभियांत्रिकी शाखेत विद्यापीठ स्तरावर दुसरा क्रमांक तर अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमध्ये पाचवा क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला आहे.
विनायक यांनी 9.85 च्या CGPA सह उत्तम कामगिरी करत संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे.
याबाबत संस्थेच्या संचालक मंडळाचे डॉ. एम. एस. गायकवाड, प्राचार्य डॉ. एस. डी. बाबर, महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी संतोष एल. म्हेत्रे, संगणक विभाग प्रमुख डॉ. शुभांगी पाटील आणि इतर विभाग प्रमुखांनी विनायक जालान यांचे कौतुक केले आहे.
संस्थेच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच सहकार्य केले असून, विनायक यांचे यश हे विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमांसोबत संस्थेच्या प्रगत शैक्षणिक तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग असल्याचे संचालकांनी सांगितले.
विनायक यांच्या या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, शिक्षण क्षेत्रात त्यांच्या प्रगतीचा प्रेरणादायी ठसा उमटला आहे.