लोणावळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोणावळा शहरातील वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने चैत्यभूमीकडे जाणाऱ्या भीम अनुयायांना मदतकार्य राबविण्यात आले. रात्री 9 ते दीड वाजेपर्यंत लोणावळा रेल्वे स्थानकावर चहा, बिस्किटे आणि पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष लोकेश भडकवाड, कार्याध्यक्ष संजय कांबळे, प्रसिद्धी प्रमुख प्रवीण रोकडे, महासचिव विशाल कांबळे, उपाध्यक्ष रोहन कांबळे व अब्दुल शेख, कोषाध्यक्ष मुरलीधर सरोडे, सहसचिव रोहन गायकवाड, सल्लागार अनिल धेंडे तसेच संघटक विशाल गायकवाड, सुमित घोडके, अभिजीत धांडोरे, अनुज सरवते, भीमसेन भालेराव, आणि सदस्य प्रदीप सोनारीकर उपस्थित होते.
तसेच, बौद्ध महासभेचे लोणावळा शहर अध्यक्ष राजेंद्र अडसुळे व महिला समितीच्या अंजली कांबळे, नीता गायकवाड, रमा वाघे, मंगल आखाडे, वनिता भडकवाड, शर्मा मॅडम, काजल धांडोरे यांसह महिला वर्गाचा कार्यक्रमात लक्षणीय सहभाग होता. कार्यक्रमाने बाबासाहेबांच्या विचारांशी निष्ठा ठेवत सामाजिक बांधिलकी आणि एकात्मतेचा संदेश दिला.