if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा : सालाबादप्रमाणे या ही वर्षी वाय. सी. क्लासेस अंतर्गत विविध क्रिडा स्पर्धा दि. 8 डिसेंबर 2024 सकाळी 7 ते सायंकाळी 7 दरम्यान संपन्न झाल्या.यास्पर्धांचे वैशिष्ट्य म्हणजे वाय सी क्लासेस च्या वतीने दरवर्षी थंडीचे औचित्य साधून ह्या मैदानी स्पर्धा घेतल्या जातात यावर्षी देखील क्रिकेट, कबड्डी, खो-खो. डॉजबॉल,टग ऑफ वॉर, लंगडी, 100M-200M स्प्रिंट, 400M रिले, स्किपिंग, चेस,कॅरम, आणि 3 पायांची शर्यत यासारख्या 15 स्पर्धा घेण्यात आल्या.
या वार्षिक क्रीडा संमेलनाच्या उदघाट्न प्रसंगी लोणावळा शहर पोलीस उपनिरीक्षक अनिल केसरकर तसेच वाय सी क्लासेस चे संचालक निवृत्ती दुडे सर,श्रीराम मारुती सेवाभावी ट्रस्ट गवळीवाडा चे दिलीप किसन लोंढे, श्रीराम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महादेव उमाजी गवळी,उपाध्यक्ष निखिल धनंजय कविश्वर, उपाध्यक्ष सुधीर दत्तात्रय शिर्के,कार्याध्यक्ष हेमंत बबनराव मिंढे,एम एन न्यूज चे संपादक अॅड. संजय पाटील श्रीराम क्रीडा मंडळाचे खजिनदार सुनिल हरीश्चंद्र मोगरे, सहकार्यवाहक आकाश दशरथ परदेशी, महामुनी चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष प्रफुल्ल काकडे, अॅड.गोविंद खंडेलवाल, सल्लागार अनिल महादेव गवळी, प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय पदक विजेते अशोक परशुराम मते,आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडू ज्योती दिपक कंधारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वसंत कालेकर,सहादु कालेकर,तुषार शाम भोई तसेच वाय. सी. क्लासेस चे सर्व माजी विध्यार्थी दिपेश गोणते,मयुर कनगुटकर, कैलास येवले,सोनल भोसले रुपाली गायखे,शिक्षिका एकता शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.निवृत्ती दुडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे वार्षिक क्रीडा संमेलन खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले.