if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त तसेच संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या वतीने लोणावळा शहरामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 106 रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले.शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र व एक ट्रॅक सूट अप्पर जर्किन भेट देण्यात आले.श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहयोगाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी बापूसाहेब भेगडे यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते. तसेच शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापत त्यांना उपस्थित सर्वांच्या वतीने उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नांगरगाव येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मठ या ठिकाणी श्री स्वामींचा अभिषेक व पूजा करण्यात आली.यावेळी बापूसाहेब भेगडे यांच्यासह मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, अतुल राऊत, साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कवीश्वर, शिवसेना उबाठा मावळ तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, ज्येष्ठ नेते किरण गायकवाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुणे जिल्हा संघटिका शादान चौधरी, लोणावळा शहर प्रमुख, बाळासाहेब फाटक, काँग्रेसचे लोणावळा शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, शिवसेना लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, कमलसील म्हस्के, माजी उपनगराध्यक्ष राजू बच्चे, माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव, मनसेचे दिनेश कालेकर, अमित भोसले, निखिल भोसले, मावळ वार्ता फाउंडेशनच्या मनीषा भंबोरी, जितुभाई कल्याणजी, भरत तिखे, संजय आडसुळे, अन्वर निम्बर्गी, दिलीप पवार, नितीन कल्याण, धवल चव्हाण, समीर खोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लोणावळा शहर अध्यक्ष नासिर शेख, महाराष्ट्र प्रदेश सदस्य बाळासाहेब पायगुडे व विनोद होगले, महिला अध्यक्ष श्वेता वर्तक, युवक अध्यक्ष अजिंक्य कुटे, दत्ता गोसावी, सचिन कालेकर, सुधीर कदम, संतोष कचरे, विनोद होगले,राजू बोराटी , रमेश दळवी, संजय घाडगे, प्रफुल राजपूत, प्रवीण करकेरा, नीलिमा घाडगे, नेहा पवार, गायत्री रिले, पूजा दास गुप्ता, लीना पारटे, अभय परदेशी, चेतन पवार, रिजवान खान, सचिन तारे, अय्याज शिकीलकर,सलीम मणियार, सचिन सरोदे, सचिन लगादे, अतुल इंगुळकर, अमोल थोरात, प्रकाश भाले, आदित्य पंचमुख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.