Friday, March 14, 2025
Homeपुणेलोणावळाराष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा यशस्वी समारोप ग्रामविकासासाठी युवकांचा सकारात्मक पुढाकार..

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा यशस्वी समारोप ग्रामविकासासाठी युवकांचा सकारात्मक पुढाकार..

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराने ग्रामविकासाचे धडे दिले..

लोणावळा : श्रीमती काशीबाई नवले शिक्षणशास्त्र महाविद्यालय, लोणावळा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ६ जानेवारी ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत मोजे कुरवंडे येथे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले.
या निवासी शिबिरात स्वयंसेवकांनी ग्रामस्वच्छता, जनजागृती कार्यक्रम, वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा, तसेच नागफणी येथील महादेव मंदिर स्वच्छता यासारखे उपक्रम राबवले. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले.
शिबिराचे आयोजन व नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. एस. एस. डफळ, प्रा. शिंगाडे बी. ए., प्रा. सुखदेव बनकर व प्रा. मुल्ला आय. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिराच्या यशस्वितेसाठी श्री. भाऊ यादव यांनी मोलाची कामगिरी बजावली. या योगदानाबद्दल प्रा. डॉ. एस. बी. देसाई यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व सोजर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे प्रा. डॉ. एस. बी. देसाई, प्रा. सुखदेव बनकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. अजित माले व सोजर विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बारबोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
शिबिरादरम्यान ग्रामपंचायत सरपंच सौ. अनिता दिलीप कडू, उपसरपंच कविता ससाने, ग्रामसेविका श्रीमती उज्वला डावरे, पोलीस पाटील श्री. प्रीतम ससाने, माजी पोलीस पाटील ताराबाई कडू व ग्रामपंचायत सदस्य यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
सात दिवसांच्या या शिबिराने सामाजिक बांधिलकी व ग्रामविकासाची प्रेरणा दिली. युवकांच्या सहभागाने ग्रामीण भागात विकासाचे नवे आदर्श निर्माण झाले.
- Advertisment -

You cannot copy content of this page