if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
प्रतिनिधी : श्रावणी कामात
लोणावळा: पुणे ग्रामीण पोलीस दलाने “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत वेहेरगाव येथे मटका अड्ड्यावर मोठी कारवाई केली. ३१ जानेवारी २०२५ रोजी पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथील श्री संतोष बोत्रे यांच्या पडीक जमिनीवर काही व्यक्ती कल्याण मटका खेळत आहेत. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने छापा टाकला आणि मटका खेळणाऱ्यांसह मटका घेणाऱ्यांवरही कारवाई केली.
गोरख रघूनाथ मोहीते, सुनिल आप्पा बंडगर, धोंडू दत्तू बोरकर, विश्वनाथ संभाजी गायकवाड, गजानन किसन पारधी, सचीन गणेश तिकोणे, मधूकर केशव बगाडे, विलास भागुजी देशमुख, संदीप षांताराम कौदरे आणि चंद्रकांत देवकर यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या छापेमारीत पोलिसांनी एकूण १,६४,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये रोख रक्कम, जुगारी साहित्य, मोटार सायकल, पावती पुस्तके आणि मोबाईल फोन यांचा समावेश आहे. पोलिसांच्या यशस्वी कारवाईमुळे वेहेरगाव परिसरातील मटका खेळणाऱ्यांवर आणि घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली गेली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली, लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलिस पथकातील पोहवा नितेश (बंटी) कवडे, अंकुश नायकुडे, दत्ता शिंदे आणि अंकुश पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे जुगार अड्ड्यांचे नेटवर्क तोडण्यात आले आहे, आणि पोलिसांची कार्यवाही अद्यापही सुरू आहे.