Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये " श्री विठ्ठल मूर्ती प्रती पंढरपूर " समोरील रस्त्यात येणार जीव...

कर्जतमध्ये ” श्री विठ्ठल मूर्ती प्रती पंढरपूर ” समोरील रस्त्यात येणार जीव !

रस्ता डांबरीकरण काम प्रगती पथावर…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती पसरलेल्या व आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या संकल्पनेतील ” श्री विठ्ठल मूर्ती प्रती पंढरपूर आळंदी ” परिसरातील अतिशय खराब झालेला रस्त्यात आता जीव येणार आहे . हजारो पर्यटक , अनेक कर्जतकर , विविध संस्था , संघटनेने आक्षेप घेतलेल्या या रस्त्यावर इतक्या उशिरा का होईना दुरुस्ती होत असल्याने ,…. ” थोडा उशीरच झाला , पण देर है – दुरुस्त है “……अस म्हणत , अनेकांनी तोंड मुरडली.

सध्या कर्जत मध्ये सर्वच पक्ष थंड झाले आहेत . लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका झाल्या , मात्र अद्यापी जिल्हा परिषद , पंचायत समिती , ग्राम पंचायत तर शहरात कर्जत नगर परिषदेच्या निवडणुका बाकी आहेत . त्यामुळे इतर राजकीय पक्षा बरोबरच राजकीय नेते देखील कार्यरत नाहीत . कार्यरत आहेत ते फक्त खासदार व आमदारच.

कर्जत चारफाटा ते आमराई कडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या पावसाळ्यात खूपच दुरावस्था झाली होती. झालेल्या खड्ड्यातून कर्जत शहरात आलेल्या पर्यटकांना , येथील तालुक्यातील व शहरातील नागरिकांना या रस्त्याचा खूपच त्रास सहन करावा लागत होता . कर्जत तालुका हा ” पर्यटन दृष्ट्या ” महत्त्वाचा असल्याने अशा खड्डेमय ” रस्त्यांची गाथा ” व परिस्थिती आलेले पर्यटक बघून ” नाके मुरडत ” जात होते . त्यामुळे कर्जतची ” प्रतिमा ” मलिन होत असताना हा रस्ता एम एस आर डी सी च्या ताब्यात असल्याने अशा अधिकाऱ्यांना त्यांच्या ” निद्रिस्त ” भूमिके विरोधात बोलण्याची ” उंची ” येथील नागरिकांची नसल्यानेच हा रस्ता अद्याप पर्यंत रखडलेला होता.

विशेष म्हणजे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे व या विधानसभेला त्यांना चुरशीची लढत देणारे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते तथा परिवर्तन आघाडीचे उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांच्या कार्यालयाच्या मधीलच हा खडतर प्रवासाचा रस्ता असल्याने याची विशेष चर्चा होत होती . मात्र आता या रस्त्यावर डांबरयुक्त गालिचा टाकण्यात येत असल्याने या रस्त्यात आता ” जीव ” आला असून सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे व श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केलेल्या प्रयत्नांचे आभार व्यक्त केले जात आहेत .
- Advertisment -

You cannot copy content of this page