Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडविकास कार्याचा अटकेपार झेंडा नेणारे , " कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे...

विकास कार्याचा अटकेपार झेंडा नेणारे , ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” एक महान व्यक्तिमत्त्व !

” पोसरी ते विधान भवन एक खडतर प्रवास “

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” मी सर्वांना पुरून उरणार , व विजयी होणार ” अशी भीष्म गर्जना करत सन २०२४ ची झालेल्या वादळी निवडणुकीत अनेक बलाढ्य शक्तींना नामोहरम करत विजयश्री खेचून आणणारे कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट लाडके आमदार महेंद्र शेठ थोरवे एक ध्येयवेडे नेतृत्व पाहण्यास मिळतात . अस म्हणतात कि , एखादी व्यक्ती ध्येयाने पछाडली तर ते ध्येय साध्य करेपर्यंत शांत बसत नाही , हाच धागा पकडून ” गगनाला गवसणी ” घालून आपल्या मतदार संघाचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवून विकास कामे काय असतात , हे दाखवून देणारे व त्यासाठी भिंगरी सारखे १८ तास काम करणारे कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट लाडके आमदार महेंद्र शेठ थोरवे हे एक ” राजकीय पटलावर महान व्यक्तिमत्त्व ” म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

अतिशय खडतर असा त्यांचा ” पोसरी ते विधानसभा भवन ” एक राजकीय प्रवास आहे . त्यांच्या जीवनाच्या अंतरंगात डोकावल तर एक ध्येयवादी – महत्त्वाकांक्षी – जे ठरल ते घडवणारा असा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा मावळा , हेच दिसेल . याच जोरावर त्यांची राजकीय कारकीर्द घुसळून निघालेल्या ” हलाहल ” सारखीच व ते प्राशन करून पचवणे , हेच त्यांच्या ” राजकीय यशाचे ” गुपित म्हणावे लागेल . साधा ” शिवसैनिक ते उपजिल्हाप्रमुख ” हि त्यांची कारकीर्द सर्वांच्याच आठवणीतील आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार व आपल्या मनगटाच्या ताकदीवर त्यांनी शिवसेना या कर्जत खालापूर तालुक्यात जिवंत ठेवली . सन २०१४ साली विधानसभेची शिवसेनेची तिकीट मिळाली नाही , पण त्याही परिस्थितीत न डगमगता दोन नंबरची मते मिळवून फक्त १८०० च्या फरकाने झालेला पराभवाने न खचता , ” तु अजुन जिंकला नाहीस ” , हे मनाला समजावून पुन्हा उभारी घेवून २०१९ साली मोठ्या मताधिक्याने निवडून येणारा व पुन्हा २०२४ साली देखील सर्वांच्या सहकार्याने निवडून येऊन हे ” नेतृत्व ” काही वेगळच म्हणाव लागेल.

त्यांनी आमदारकी हाताशी असताना हातावर हात ठेवून गप्प न बसता आज चार वर्षात व आजपर्यंत २ हजार रु . करोड इतका निधी आणून गाव – वाडे – पाडे – शहर – प्रभाग – ग्रामीण भागापर्यंत विकासाची गंगा नेवून दोन्ही तालुके सुजलाम – सुफलाम असा परिसर पर्यटकाला साजेसा केला आहे . ऐतिहासिक वास्तू , उल्हास नदीच्या तीरावर प्रती पंढरपूर श्री विठ्ठलाची ५२ फुटी सुंदरशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व आता श्रीरामाची ३० फुटी मूर्ती बसवून संपूर्ण महाराष्ट्राला कर्जतमध्ये ते रूप पहाण्यास लावणारे , आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या मनात आलेली हि ” संकल्पना ” आपल्या जन्मदाते आई – बाबांच्या संस्कारातून घडल्याचे ते सांगतात . त्यांच्या या यशस्वी राजकीय प्रवासात त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद , मनोहर दादांची यशस्वी साथ , लहान भाऊ विश्वनाथ , सावली सारखी मागे बळ देणारी त्यांची पत्नी सौ. मीना ताई , त्यांचे पुतणे प्रसाद , घरातील सर्व सदस्य व शिवसैनिकांची प्रचंड ताकद त्यांच्या पाठीशी उभी आहे.

मा. मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अत्यंत निकटवर्तीय अशी ख्याती असलेले कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी त्यांचे आजच्या त्यांच्या ७ एप्रिल या वाढदिवसा दिनी आशीर्वाद घेवून पुन्हा एकदा राजकीय पटलावर ” व्हिजन – २ ” मध्ये गरुड भरारी घेण्यासाठी बळ मिळवले आहे . कर्जत खालापूर मतदार संघात त्यांच्या सारखे लोकप्रतिनिधी – लोकनायक व लोकनेते होणे , अशक्यच आहे . ” राजकीय क्षितिजावर ” हा चमकणारा ” अमूल्य तारा ” , असाच चमकत राहून त्यांच्या हातून अनगणीत कार्य घडो , व ते करण्यास त्यांचे आरोग्य सुदृढ राहो , हिच ईश्वरचरणी प्रार्थना , कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक लाख लाख शुभेच्छा !
- Advertisment -

You cannot copy content of this page