Wednesday, July 2, 2025
Homeपुणेलोणावळाजागतिक वसुंधरा दिनानिमित्त लोणावळा नगरपरिषदेचा पर्यावरणपूरक उपक्रम..

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त लोणावळा नगरपरिषदेचा पर्यावरणपूरक उपक्रम..


रायगड येथील गणपती मंदिर रोड परिसरात वृक्षारोपण; ‘माझी वसुंधरा’ शपथ घेऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश..

प्रतिनिधी : श्रावणी कामत.
लोणावळा : जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने सोमवारी ( दि. २२ एप्रिल ) पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण कार्यक्रम रायवूड येथील गणपती मंदिर रोड परिसरात उत्साहात पार पडला. Auxillium Convent Highschool च्या मागील परिसरात झालेल्या या उपक्रमात विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थितांनी “माझी वसुंधरा” ही शपथ घेऊन पर्यावरण रक्षणाची बांधिलकी जपण्याचा संकल्प केला. नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात लोणावळा नगरपरिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यशवंत मुंडे, कार्यालय अधीक्षक संतोष खाडे, स्वच्छता निरीक्षक सौ. ऐश्वर्या काटकर, विजय लोणकर, जितेंद्र राऊत, शहर समन्वयक विवेक फडतरे यांच्यासह नगरपरिषदेचे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली असून, लोणावळा नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. आगामी काळातही असे उपक्रम राबवून हरित लोणावळा घडवण्याचे नगरपरिषदेचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page