Friday, June 20, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतमध्ये मोफत शासकीय दाखले शिबिर " आमदार महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन "...

कर्जतमध्ये मोफत शासकीय दाखले शिबिर ” आमदार महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन ” व कर्जत तहसीलचा स्तुत्य उपक्रम !

अनेकांनी लाभ घेत उपक्रमाचे केले कौतुक…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रांची व विविध दाखल्यांची गरज ओळखून ” आमदार महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन ” व कर्जत तहसील कार्यालयाच्या सहकार्याने ” मोफत शासकीय दाखले वाटप शिबीर ” आज बुधवारी दिनांक ०४ जून २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत रॉयल गार्डन – कर्जत , येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला . यांत ४०० च्या वर विद्यार्थी व नागरिकांनी उपस्थिती दर्शवून या शिबिराचा लाभ घेतला.


कर्जत तहसीलदार धनंजय जाधव यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले . या मोफत दाखले वाटप शिबिरात एक व तीन वर्ष उत्पन्न दाखला , जात प्रमाणपत्र , नॉन क्रिमिलेअर दाखला , वय अधिवास व राष्ट्रीयत्व दाखला , जेष्ठ नागरिक कार्ड , आधार कार्ड , संजय गांधी निराधार योजना , अधिवास दाखला व रहिवास दाखला , ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र , स्थानिक वास्तव्याचा दाखला , शिधापत्रिका , EWS ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र आदी दाखल्यांसाठी सर्वांनी लाभ घेतला.


यावेळी एकाच छताखाली सर्व प्रकारचे शासकीय दाखले आणि सेवा उपलब्ध करून देणारे हे ” बहुउद्देशीय शिबिर ” असल्याने या उपक्रमाचे व ” आमदार महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशनचे ” सर्वांनी कौतुक केले . या प्रसंगी नायब तहसीलदार सचिन राऊत , गोविंद कौटुंबे , आशा म्हात्रे, संतोष जांभळे, वैशाली पाटील, शीतल मोरे, पार्वती वाघ, सुनील रसाळ , तलाठी अमित उजगरे , अरुण देशमुख, विलास श्रीखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर शिबिरासाठी कर्जत पंचायत समितीचे मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे, तसेच कर्जत नगरपालिकेचे मा. नगरसेवक ॲड. संकेत भासे, प्रसाद थोरवे यांनी भेट दिली.


या प्रसंगी शिवसेना कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, शहर संघटक नदीम खान, तालुका प्रवक्ते रमाकांत जाधव, सुदेश देवघरे , संघटक संजय मोहिते, हर्षल मोरे, दर्शन वायकर, अनुप साबणे, महेंद्र निगुडकर, समीर चव्हाण, दिनेश कडू, प्रदीप वायकर, तसेच आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सहभाग महत्त्वाचा होता .

- Advertisment -

You cannot copy content of this page