![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
फ्रेंड्स ऑफ नेचर आणि लायन्स क्लब तळेगाव दाभाडेच्यावतीने आनंदोत्सवाचे आयोजन..
तळेगाव दाभाडे : ( प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याचा देखील समावेश असून, या ऐतिहासिक गौरवाच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांतून आनंद व्यक्त केला जात आहे.
या ऐतिहासिक क्षणाचा उत्सव साजरा करण्यासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर आणि लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा शिवाजी चौक ते फ्रेंड्स ऑफ नेचर निसर्ग अभ्यासिका दरम्यान पार पडणार असून, या दरम्यान साखर वाटप करून आनंद साजरा करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणांमध्ये लोहगड विसापूर विकास मंचाचा सत्कार आणि शिवव्याख्याते डॉ. प्रमोद बोराडे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन फ्रेंड्स ऑफ नेचरचे अध्यक्ष डॉ. गणेश सोरटे आणि लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री. राजेंद्र झोरे यांनी केले आहे.
लोहगड विसापूर विकास मंचाचे दुर्गसंवर्धनातील भरीव योगदान..
लोहगड विसापूर विकास मंच गेली २५ वर्षांपासून अविरतपणे दुर्गसंवर्धनाचे कार्य करत असून, “संघटन मावळ्यांचे, संवर्धन गड किल्ल्यांचे” हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने गडावरील जीर्ण झालेल्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार, महाशिवरात्री यात्रेचे आयोजन, तसेच भारतीय पुरातत्व विभागाशी सातत्याने पाठपुरावा करून नवीन गणेश दरवाजा बसविणे, गडाचे दरवाजे नियमित वेळेत बंद करणे आणि गैरप्रकारांवर नियंत्रण आणणे अशी अनेक कामे त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहेत.
तसेच, गडावर पायऱ्या, बुरुज, तटबंदी यांची दुरुस्ती सुरू असून, गडाच्या पायथ्याशी भव्य शिवस्मारकाची उभारणी देखील मंचाच्या वतीने करण्यात आली आहे. भविष्यात शिवसृष्टी साकारण्याचे मंचाचे ध्येय असून, यासाठी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.